Free Fire Max: आत्ताच क्लेम करा गरेनाने जारी केलेले नवीम रिडीम कोड्स, मिळवा खास इन-गेम रिवॉर्ड्स
गरेनाने नेहमीप्रमाणे आज देखील त्यांच्या प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स जारी केले आहेत. या रिडीम कोड्सची यादी आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्यामुळे प्लेअर्स लगेचच हे रिडीम कोड्स क्लेम करून त्याच्या मदतीने आकर्षक रिवॉर्ड्स जिंकू शकतात.
फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्सची दिवाळी आणखी चांगली व्हावी यासाठी वेगवेगळे ईव्हेंट आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना दिवाळी संबंधित रिवॉर्ड्स ऑफर केले जात आहेत. यातीलच एक ईव्हेंट आहे Two Slides Collide. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स गोल्ड आणि दिवाळीत फोडले जाणारे अनार फटाका क्लेम केला जाऊ शकतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी प्लेअर्सना त्यांच्याकडे असलेले डायमंड खर्च करण्याची गरज नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्समध्ये आयोजित करण्यात आलेला टू स्लाईड्स क्लाइड इव्हेंट अत्यंत खास आहे. हा गेमच्या ईव्हेंट सेक्शनमध्ये एक्टिव आहे. यामध्ये गोल्डसह फटाके कोन लूट बॉक्स, बोनफायर प्लेकार्ड आणि आइस अँड फायर कार्ड देखील मिळणार आहे. हे सर्व रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करण्याची देखील गरज नाही.