Free Fire Max मॅक्स गेमर्ससाठी हाच तो क्षण! Garena घेऊन आली 13 ऑगस्टचे रेडिम कोड्स, स्किन आणि बंडल मिळणार मोफत
फ्री फायर मॅक्समध्ये युनिक डिझाईनवाली गन स्किन आणि बंडल सर्वच प्लेअर्सना आकर्षित करतात. या दोन्ही गेमिंग आयटम्समुळे गेममधील कॅरेक्टरचा पूर्ण लूक बदलतो. गेमर्सना एक वेगळी ओळख मिळते आणि कॅरेक्टर अधिक पावरफुल देखील होतो. गन स्किन आणि बंडलमुळे कॅरेक्टरचा लूक एन्हांस होतो. पण हे दोन्ही गेमिंग आयटम्स अनलॉक करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करावे लागतात. डायमंड पाहिजे असतील तर पैसे खर्च करावे लागतात. पण प्लेअर्सना हे दोन्ही गेमिंग आयटम्स मोफत मिळण्याची देखील संधी असते. कसं, ते आता जाणून घेऊया.
फ्री फायर तयार करणारी कंपनी गरेना त्यांच्या प्लेअर्ससाठी रोज नवीन रेडिम कोड्स जारी करत असते, ज्यांच्या मदतीने प्लेअर्सना नवीन आणि आकर्षक गेमिंग आयटम्स जिंकण्याची संधी मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच यासाठी कोणतेही डायमंड खर्च करावे लागत नाहीत. गरेनाने फ्री फायर प्लेअर्ससाठी आज 13 ऑगस्ट रोजी देखील रेडिम कोड्स जारी केले आहेत, या रेडिम कोड्सच्या मदतीने प्लेअर्सना इन गेम आयटम्स मोफत मिळण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
गरेनाने जारी केलेले कोड्स रेडिम करून प्लेअर्स ढासू रिवॉर्ड्स जिंकू शकतात. ज्यामध्ये बंडल आणि स्किनसारख्या अनेक वस्तूंचा समावेश असतो. जर प्लेअर्सकडे या वस्तू असतील तर गेमिंगची मजा आणखी वाढते. तसेच या गेमिंग आयटम्समुळे कॅरेक्टरची ताकद देखील वाढते. शिवाय या गेमिंग आयटम्ससाठी डायमंड खर्च करण्याची देखील गरज नसते.
Free Fire MAX आणि BGMI भारतात सर्वाधिक खेळले जाणारे ऑनलाईन बॅटल गेम आहे. मात्र या गेमबाबत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. छत्तीसगडमधील एका जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत या खेळांवर बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी हे खेळ खेळताना पकडले गेले तर त्याला 5 हजार रुपये दंड आकारला जाईल. ही बातमी निश्चितच अनेक गेमर्सना आश्चर्यचकित करणार आहे.
लहान मुलांमध्ये Free Fire MAX आणि BGMI ची लोकप्रियता वाढत आहे. दोन्ही गेम्स कंपन्या त्यांच्या प्लेअर्सना मर्यादित काळासाठी गेम खेळण्याचा सल्ला देतात. पण असे अनेक लोकं जे याचे पालन करत नाहीत. ज्यामुळे त्यांच्या शरीरावर आणि मनावर याचा वाईट परिणाम पाहायला मिळतो. जर मर्यादित काळासाठी गेम खेळला तर त्यामुळे आपलं मनोरंजन होतं. पण जर गेमंच प्रमाण अति झालं तर आपल्यासाठी धोकादायक आहे. याच सर्वांचा विचार करून आता छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यात Free Fire MAX आणि BGMI गेम बॅन करण्यात आला आहे.