Ghibli नंतर आता Crochet स्टाईलचं क्रेझ! लोकरीच्या धाग्यांपासून तयार केली जाणार Image, Google वर आला फोटोंचा पूर
तुम्हाला आठवतंय का, अलीकडेच सर्वांमध्ये Ghibli स्टाईल ईमेजची क्रेझ निर्माण झाली होती. लोकं AI चॅटबोट चॅटजीपीटीचा वापर करून Ghibli स्टाईल ईमेज तयार होते. सोशल मीडियावर तर या ईमेजचा पूर आला होता. राजकीय नेते, सेलिब्रिटी, कलाकार, सामान्य माणसं सर्वांनाच Ghibli स्टाईलने भुरळ घातली होती. Ghibli स्टाईल ईमेजनंतर आता एक नवीन ट्रेंड सुरु झाला आहे, हा ट्रेंड म्हणजेच Crochet स्टाईल ईमेज.
72 हजार फोटो आणि बरंच काही… Tea App चा Data Leak, पुरूषांना रेट करणाऱ्या अॅपवर आलं मोठं संकट!
Google चे AI चॅटबॉट Gemini आता केवळ तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंच देत नाही तर Crochet स्टाईल ईमेज देखील तयार करू शकतो. Gemini च्या मदतीने आता तुम्ही रंगीबेरंगी, सर्जनशील आणि अद्वितीय Crochet स्टाईल ईमेज देखील तयार करू शकता. या ईमेज अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात. हे फीचर अशा लोकांसाठी सुरु करण्यात आलं आहे, ज्यांना डिजाइन, आर्ट आणि क्रिएटिविटीमध्ये आवड आहे. (फोटो सौजन्य – X)
क्रोशिया (Crochet) एक पारंपरिक कला आहे. ज्यामध्ये लोकरीचा धागा आणि सुईच्या मदतीने एक सुंदर डिझाइन तयार केलं जातं. याच्या मदतीने कपडे, सजावटीचे सामान, टेबल कवर, खेळणी आणि हँडमेड गिफ्ट्स बनवली जातात. आता Google Gemini ही कला डिजिटल रूपात सादर करते. तुम्ही टेक्स्ट कमांड वापरून या स्टाइलमध्ये कोणत्याही गोष्टीची इमेज तयार करू शकता. सध्या गुगल जेमिनी वापरून तुम्ही स्वत:चे Crochet स्टाईल ईमेज तयार करू शकत नाही. मात्र इतर फोटोंसाठी तुम्ही फोटो अपलोड करून तुम्हाला केवळ “Crochet style Delhi skyline” अशी कमांड द्यावी लागणार आहे, त्यानंतर Gemini तुमच्यासाठी ईमेज तयार करणार आहे.
— Google India (@GoogleIndia) July 26, 2025
तुम्हाला केवळ Gemini वर एक सिंपल कमांड द्यावी लागणार आहे, त्यानंतर अगदी काही क्षणातच Gemini क्रोशिया स्टाइल इमेज बनवणार आहे. “क्रोशेट स्टाईल मुंबई स्कायलाइन” म्हटल्यानंतर जेमिनी तुमच्यासाठी मुंबई स्कायलाइनचे एक चित्र तयार करेल जे लोकरीपासून बनवल्यासारखे दिसेल. त्याचप्रमाणे, तुम्ही क्रोशेट स्टाईलमध्ये कार, चित्रपट पोस्टर्स, शहरे, खोल्या किंवा इतर काहीही तयार करू शकता. Google सध्या पर्सनल फोटो क्रोशिया स्टाइलमध्ये बदलण्याची सुविधा देत नाही.
Google Gemini केवळ ईमेजपुरतेच मर्यादित नाही. आता 23 जुलैपासून AI आता YouTube Shorts आणि Google Photos मध्ये देखील इंटीग्रेट झाले आहे. याचा अर्थ असा की तुम्ही तुमचा फोटो टेक्स्ट कमांड वापरून व्हिडिओ, कॉमिक, स्केच किंवा 3D अॅनिमेशनमध्ये रूपांतरित करू शकता. या वैशिष्ट्याचे बेस मॉडेल Veo 2 आहे, जे डिसेंबर 2024 मध्ये लाँच झाले होते. सध्या ही सुविधा अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये उपलब्ध आहे आणि लवकरच भारतासह इतर देशांमध्येही ती सुरू केली जाईल.