Google URL Shortener: Google ने केली मोठी घोषणा! 25 ऑगस्टपासून बंद होणार 'ही' सर्विस, आता काय करणार युजर्स?
टेक जायंट कंपनी Google ने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने केलेल्या या घोषणेमुळे युजर्सना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, Google ची सर्वात लोकप्रिय आणि चर्चित सर्विस Google URL Shortener लवकरच बंद केली जाणार आहे. जे युजर्स या सर्विसचा वापर करतात, त्यांना एका महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर ही सर्विस बंद केली जाणार आहे. कंपनीने अचानक केलेल्या या घोषणेमुळे अनेक युजर्सना मोठा धक्का बसला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Google URL Shortener सर्विस 25 ऑगस्टपासून पूर्णपणे बंद केली जाणार आहे. खरं तर 2018 मध्येच कंपनीने ही सर्विस बंद करण्याची घोषणा केली होती. मात्र आतापर्यंत जुने goo.gl लिंक सुरु होत्या. मात्र आता या लिंक देखील बंद केल्या जाणार आहेत. जर तुम्ही तुमची जुनी goo.gl लिंक अजून अपडेट करू शकला नसाल, तर तुमच्याकडे 25 ऑगस्ट 2025 पर्यंत वेळ आहे. या तारखेनंतर सर्व जुन्या लिंक्स बंद केल्या जातील. (फोटो सौजन्य – Pinterest)
23 ऑगस्ट 2024 पासून जेव्हाही एखादा यूजर goo.gl लिंकवर क्लिक करतो तर त्याला एक इशारा दिला जात आहे. या मेसेजमध्ये सांगितलं जात आहे की, ही लिंक लवकरच बंद होणार आहे आणि 25 ऑगस्ट 2025 पासून अशा सर्व लिंक्स काम करणे थांबवतील आणि त्यावर क्लिक केल्याने थेट 404 एरर पेज उघडेल.
Google ची ही एक अशी सेवा आहे, ज्याच्या मदतीने युजर्स कोणतेही मोठे URL एका छोट्या लिंकमध्ये बदलून ती लिंक सोशल मीडिया, ईमेल किंवा वेबसाईटवर अगदी सहज शेअर करू शकत होते. मात्र बदलत्या काळानुसार, या सर्विसचे युजर्स कमी होत असल्याचं दिसलं. अहवालांनुसार, जून 2024 पर्यंत, 99% goo.gl लिंक्सवर कोणतीही अॅक्टिव्हिटी नव्हती. त्यामुळे आता कंपनीने ही सर्विस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Google URL Shortener सर्विस बंद करण्याच्या घोषणेनंतर आता कंपनीने एक नवीन सर्विस सुरु केली आहे. गुगलने सुरु केलेली नवीन Firebase Dynamic Links (FDL) सर्विस स्मार्ट लिंकप्रमाणेच काम करते. हे लिंक्स युजर्सला थेट मोबाइल अॅप (iOS किंवा Android) किंवा वेबसाइटमधील विशिष्ट पेजवर घेऊन जाऊ शकतात. म्हणजेच आता लिंक केवळ रीडायरेक्ट होत नाहीत, तर यामुळे युजर्सचा अनुभव देखील चांगला होतो. जे डेवेलपर्स आणि वेबसाइट ओनर्स अजूनही जुन्या goo.gl लिंकचा वापर करत आहेत, त्यांना लवकरच एक नवीन URL Shortener वापरावा लागणार आहे.