AI चे गॉडफादर Geoffrey Hinton यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर
आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कधील उल्लेखनीय योगदानाबद्दल अमेरिकन प्रोफेसर John J. Hopfield आणि Geoffrey Hinton यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे. 1970 आणि 80 च्या दशकात, दोन्ही शास्त्रज्ञांनी आधुनिक AI प्रणालींचा पाया घातला, ज्याच्या आधारावर सध्या Gemini आणि ChatGPT सारखी AI चॅटबोट मॉडेल कार्यरत आहेत. हा पुरस्कार मिळाल्यानंतर Geoffrey Hinton यांनी नोबेल समितीचे आभार मानले. John J. Hopfield आणि Geoffrey Hinton यांनी केलेल्या संशोधनामुळे आज आपण AI चॅटबोट मॉडेलचा वापर करत आहोत.
हेदेखील वाचा- स्मार्टफोनचा स्फोट होण्याची ‘ही’ आहेत प्रमुख कारणं, योग्य काळजी घ्या
AI चे गॉडफादर म्हणून ओळख असलेले Geoffrey Hinton यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. Geoffrey Hinton आणि अमेरिकन प्रोफेसर John J. Hopfield यांना आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्समधील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने Geoffrey Hinton आणि अमेरिकन प्रोफेसर John J. Hopfield या दोघांच्या AI क्षेत्रातील योगदानाबद्दल नोबेल पुरस्कार जाहीर केला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
Geoffrey Hinton यांनी वर्षांपूर्वी केलेल्या संशोधनावर आजचे AI तंत्रज्ञान कार्यरत आहे. आज संपूर्ण जग AI बद्दल चिंतेत आहे. स्वतः Geoffrey Hinton यांनी लोकांना AI बद्दलच्या संभाव्य धोक्यांबद्दल चेतावणी दिली आहे. AI बद्दल ते म्हणतात की, AI वापरताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की त्याचे अनेक संभाव्य वाईट परिणाम देखील आहेत. यामुळे अनेक गोष्टी माणसाच्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. Geoffrey Hinton यांनी असेही सांगितले की, मानवाने आता आपण AI कसे नियंत्रित करू शकतो यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यावर व्यापक संशोधनाची गरज आहे. AI नियंत्रणाच्या बाहेर गेल्यास मानवाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे AI वर नियंत्रण ठेवणं मानवासाठी महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे.
हेदेखील वाचा- फ्लिपकार्ट बिग शॉपिंग उत्सव सेल झाला सुरू, सॅमसंग-गुगलसह या स्मार्टफोन्सवर धमाकेदार ऑफर्स
1970 आणि 80 च्या दशकात, प्रोफेसर जॉन जे. हॉपफिल्ड आणि Geoffrey Hinton या दोन्ही शास्त्रज्ञांनी आधुनिक AI प्रणालींचा पाया घातला, ज्याच्या आधारावर Gimeni आणि ChatGPT सारखी प्रमुख चॅटबोट मॉडेल सध्या कार्यरत आहेत. Geoffrey Hinton यांनी बॅक प्रोपगेशन अल्गोरिदमवर संशोधन केले आहे आणि डेटा पॅटर्नच्या सिद्धांतावर काम केले, जे नंतर मशीन लर्निंगमध्ये खूप उपयुक्त ठरले.
Geoffrey Hinton यांचा जन्म 6 डिसेंबर 1947 रोजी लंडनमध्ये झाला. 1970 मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून प्रायोगिक मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली आणि 1978 मध्ये एडिनबर्ग विद्यापीठातून कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये पीएचडी केली. Geoffrey Hinton यांनी प्रामुख्याने टोरंटो विद्यापीठात विविध शैक्षणिक पदांवर काम केले आहे जिथे त्यांनी AI क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 2010 मध्ये, AI चे गॉडफादर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Geoffrey Hinton यांना गेर्हार्ड हर्झबर्ग कॅनडा सुवर्णपदक देखील मिळाले. जेफ्री हिंटन मार्च 2013 मध्ये गुगल कंपनीत सामील झाले. 2013 मध्ये Google मध्ये सामील झाल्यानंतर जवळपास 10 वर्षांनी, म्हणजे 2023 मध्ये, Geoffrey Hinton यांनी Google मधील त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.