Vi युजर्ससाठी आनंदाची बातमी! कंपनीने केली कमाल, नेटवर्कशिवाय करता येणार व्हिडीओ आणि ऑडियो कॉल्स
तुम्ही देखील व्हिआय युजर आहात का? किंवा तुम्ही तुमचं सिम व्हिआयमध्ये पोर्ट करण्याचा विचार करत आहात का तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. व्हिआय त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन सेवा सुरु करत आहे, ज्याच्या मदतीने युजर्स नेटवर्कशिवाय ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल्स करण्यासाठी सक्षम असणार आहेत. ज्या ठिकाणी नेटवर्क नाही अशा ठिकाणी व्हिआयने सुरु केलेल्या या सर्विसचा फायदा होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारतातील सॅटेलाईट इंटरनेटबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. या अपडेट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, एलन मस्क लवकरच भारतात त्यांची सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करणार आहे. यासाठी त्याला सरकारकडून मान्यता देखील देण्यात आली आहे. एलन मस्कच्या स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेटची चर्चा सुरु असतानाच आता व्हिआयच्या सॅटेलाईट इंटरनेटबाबत काही माहिती समोर आली आहे. व्हिआयने त्यांच्या खेड्यातील युजर्सना अधिक चांगली सर्विस देता यावी, यासाठी एक निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य – X)
व्हिआयने अमेरिकी सॅटेलाइट कम्युनिकेशन कंपनी AST Space Mobile सह भागिदारीची घोषणा केली आहे. AST Space Mobile ही एक अशी कंपनी आहे जी एलन मस्कच्या SpaceX प्रमाणेच डायरेक्ट सॅटेलाईटद्वारे मोबाईलवर नेटवर्क प्रोव्हाईड करण्याच्या टेक्नोलॉजीवर काम करत आहे. कंपनीने केलेल्या या भागिदारीचा फायदा व्हिआय युजर्सना होणार आहे.
ही टेक्नोलॉजी खास आहे कारण याचा वापर करण्यासाठी युजर्सना कोणत्याही खास डिव्हाईस, हार्डवेयर किंवा सॉफ्टवेयरची आवश्यकता नाही. रेगुलर स्मार्टफोनद्वारे तुम्ही व्हॉईस कॉल, व्हिडीओ कॉल आणि इंटरनेटचा वापर करू शकणार आहात. म्हणजेच आता तुम्हाला व्हॉईस कॉल, व्हिडीओ कॉल आणि इंटरनेटचा वापर करण्यासाठी नेटवर्क सिग्नलवर अवलंबून राहावे लागणार नाही. तुम्ही नेटवर्कशिवाय व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करू शकणार आहात. याचा सर्वात जास्त फायदा अशा युजर्सना होईल जिथे नेटवर्क नाही किंवा नेटवर्क अत्यंत कमकुवत आहे.
AST Space Mobile ने अंतराळातून थेट व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करून या तंत्रज्ञानाची चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी झाली आहे. या चाचणीदरम्यान कोणत्याही विशेष मोबाईल फोनचा वापर करण्यात आला नाही. या चाचणीदरम्यान साध्या फोनवरून कॉल करण्यात आला होता. जून 2023 मध्येही कंपनीने सॅटेलाइट इंटरनेट सेवेद्वारे 10 Mbps पेक्षा जास्त 4G डाउनलोड स्पीड मिळवला होता. त्याच वेळी, सप्टेंबर 2023 मध्ये, पहिल्यांदाच 5G व्हॉइस कॉलची चाचणी घेण्यात आली.
कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही की कंपनीची ही सॅटेलाईट सर्विस कधी सुरु होणार आहे. मात्र कंपनीने घोषणा केली आहे की, युजर्सना लवकरच या नवीन सर्विसचा फायदा घेता येणार आहे. VI ने त्यांच्या सॅटेलाइट सर्विसच्या लाँचिंगबद्दल अद्याप काहीही उघड केलेले नाही, परंतु कंपनीने सांगितले आहे की लवकरच त्याची घोषणा केली जाईल.