केवळ 3 स्टेप्स... काही क्षणातच तुम्ही अपलोड केलेला फोटो बनणार व्हिडीओ! Google Gemini करणार अनोखी जादू
तुम्ही देखील अँड्रॉईड स्मार्टफोन युजर आहात का? तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये Google Gemini नक्कीच असेल. बरेच स्मार्टफोन युजर्स त्यांच्या कामांसाठी Google Gemini चा वापर करतात. Google Gemini मध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे युजर्सची काम अगदी चुटरीसरशी होऊ शकतील. कंपनी बदलत्या काळासोबत त्यांच्या AI असिस्टेंट Google Gemini मध्ये सतत बदल करत आहे. त्यामुळे युजर्सचा अनुभव दिवसेंदिवस चांगला होत आहे.
Nothing Phone 3 vs OnePlus 13: कोणता स्मार्टफोन आहे वॅल्यू फॉर मनी? खरेदी करण्यापूर्वी वाचा सविस्तर
आता देखील कंपनीने Google Gemini मध्ये एक नवीन फीचर आणलं आहे. हे फीचर युजर्ससाठी अत्यंत खास ठरणार आहे. कारण या फीचरच्या मदतीने युजर्स अगदी काही क्षणातच फोटोपासून व्हिडीओ तयार करू शकणार आहेत. हा व्हिडीओ 8 सेकंदांचा असणार आहे. यामध्ये ऑडियो देखील जोडला जाणार आहे. त्यामुळे युजर्सना आता एका नवीन फीचरचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. खरं तर हे फीचर काही AI चॅटबोट्समध्ये आधीपासून पेड युजर्ससाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Google ने त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की, नवीन फीचर पावरफुल व्हिडीओ जनरेशन मॉडेल Veo 3 वर आधारित असणार आहे, जो फोटोला ना केवळ एनिमेट करतो, तर त्यामध्ये जिवंतपणा देखील आणतो. याच्या मदतीने तुम्ही पेंटिंग्स, नेचर शॉट्स आणि अगदी सामान्य वस्तूंना देखील जिवंत करू शकता. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला केवळ 3 स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. या तीन स्टेप्समध्ये तुम्ही फोटोला व्हिडीओ बनवू शकता.
सर्वात आधी तुमच्या अँड्रॉईड डिव्हाईसवर Gemini ओपन करा आणि स्क्रीनच्या तळाशी असलेल्या ‘+’ बटणावर टॅप करून तुमच्या आवडीचा कोणताही फोटो अपलोड करा.
अपलोड केलेल्या फोटोखालील टेक्स्ट बॉक्समध्ये, त्या फोटोसोबत तुम्हाला कोणती कृती करायची आहे त्याबाबत माहिती द्या. उदाहरणार्थ – “मांजरीने उंदरावर उडी मारली पाहिजे”, किंवा “आकाशातील ढग हलले पाहिजेत आणि पक्षी उडत राहिले पाहिजेत.” असा प्रॉम्प्ट द्या.
फोटो अपलोड करून करून प्रॉम्प्ट दिल्यानंतर आता सेंड बटणावर क्लिक करा आणि जेमिनीला काही काळासाठी त्याचे काम करू द्या. सुमारे 1 ते 2 मिनिटांत ते 8 सेकंदांचा 720p HD व्हिडिओ तुमच्यासमोर असेल. हा व्हिडीओ तुम्ही डाउनलोड किंवा शेअर करू शकता.
व्हिडीओचा रेशियो 16:9 असतो आणि तो MP4 फॉर्मेट मध्ये येतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसणारा एआय-जनरेटेड वॉटरमार्क असतो, तसेच व्हिडिओ एआयने तयार केला आहे हे ओळखण्यासाठी एक अदृश्य SynthID डिजिटल वॉटरमार्क असतो. कंपनीने सध्या हे फीचर Google AI Pro आणि Ultra सब्सक्राइबर्ससाठी सुरु केले आहे.