
माणसांना नो एंट्री? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Moltbook चर्चेत! फक्त AI Agents तयार करू शकतात अकाऊंट
या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव Moltbook असं आहे. हे प्लॅटफॉर्म यूजर्स सर्च करू शकतात, पाहू शकतात पण तिथे आपलं अकाऊंट तयार करू शकत नाही. हे प्लॅटफॉर्म Reddit सारखे आहे. यामध्ये AI एजेंट्स त्यांचे मत मांडू शकतात आणि दुसऱ्या AI एजेंट्ससोबत चॅट करू शकतात. Moltbook प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसांत 1.5 लाखांहून अधिक एआई एजेंट्स उपलब्ध आहेत. हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नक्की काय आहे, त्याचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
moltbook for developers is now in early access 🦞 build apps for AI agents. let them authenticate with their moltbook identity. one API call to verify. 1.2M+ agents already registered. your app could be their next destination. apply now → https://t.co/v9EspLy9eJ pic.twitter.com/Mu2RLxmncH — moltbook (@moltbook) January 31, 2026
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Moltbook ओपन-सोर्स पर्सनल एआई असिस्टेंट आहे, जो OpenClaw इकोसिस्टमचा एक भाग आहे. हे पीटर स्टाइनबर्गन यांनी वीकेंड प्रोजेक्ट म्हणून डेव्हलप केले होते. मात्र कमी कालावधीतच हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि या प्लॅटफॉर्मला लोकांची पसंती मिळू लागली. पीटर स्टाइनबर्ग यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की, काही आठवड्यांतच प्लॅटफॉर्मला 2 मिलियन विजिटर्स मिळाले. OpenClaw बद्दल बोलायचं झालं तर याच्या मदतीने यूजर्स त्यांच्या कंप्यूटरवर AI एजेंट्स चालवू शकतात. हे व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, डिस्कॉर्ड आणि मायक्रोसॉफ्ट टीम्स सारख्या अॅप्सशी कनेक्ट होते आणि यूजरचे कॅलेंडर आणि फ्लाइट डिटेल्स देखील तपासू शकते.
AI एजेंट्ससाठी विशेषत: तयार करण्यात आलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला Octane AI चे सीईओ मॅट श्लिख्टने तयार केले आहे. त्यांचे असं म्हणणं आहे की, हे प्लॅटफॉर्म एका फोरमप्रमाणे काम करते, जिथे AI एजेंट्स पोस्ट करू शकतात. यासोबतच दुसऱ्या AI एजेंट्ससोबत चॅट करू शकतात आणि त्यांच्या पोस्टवर कमेंट्स देखील करू शकतात. या सर्व प्रोसेसमध्ये मानवी व्यत्यय अतिशय कमी आहे. Moltbook च्या वेबसाईटवर असं सांगण्यात आलं आहे की, हे AI एजेंट्सचे सोशल नेटवर्क आहे. Moltbook वर आतापर्यंत सुमारे 18 हजार पोस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुमारे 2 लाखांहून जास्त कमेंट्स करण्यात आले आहेत. या पोस्ट आणि कमेंट्स माणसं पाहू शकतात.