
Android वर संपला फ्रॉडचा खेळ! बँकिंग अॅप्ससाठी Google घेऊन आला इन-कॉल स्कॅम प्रोटेक्शन, अशा पद्धतीने करणार काम
सर्च जायंटने घोषणा केली आहे की, यूएसमध्ये डिव्हाईससाठी अँड्रॉईड इन-कॉल स्कॅम प्रोटेक्शनचे पायलट प्रोग्राम वाढवले जात आहेत. कंपनीने यूजर्सची सुरक्षा अधिक वाढावी, यासाठी हे नवीन फीचर डिझाईन केलं आहे. या लेटेस्ट सेफ्टी फीचर रोलआउट करण्यासाठी कंपनीने Cash App आणि JPMorgan Chase सारख्या बँकांसोबत पार्टनरशिप केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या प्रोग्रामचा उद्देश यूजर्सना स्कॅमपासून सुरक्षा देणं हा आहे. जेव्हा स्कॅमर्स यूजर्सना कॉल दरम्यान फोनची स्क्रीन शेअर करायला लावतात आणि महत्त्वाचा डेटा अॅक्सेस करतात, पैसे ट्रान्सफर करतात आणि दुर्भावनापूर्ण अॅप्स इन्स्टॉल करतात, अशावेळी हे नवीन फीचर यूजर्सना अलर्ट पाठवते. हे नवीन फीचर स्कॅम ओळखण्यासाठी आणि स्कॅमपासून यूजर्सना सुरक्षा देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. जिथे फसवणूक करणारे यूजर्सना त्यांची स्क्रीन शेअर करण्यास प्रवृत्त करतात जेणेकरून ते बँक खात्याची माहिती मिळवू शकतील आणि पैशाचे व्यवहार सुरू करू शकतील.
या प्रोग्रामअंतर्गत, जेव्हा एखादा यूजर स्क्रीन करताना किंवा अनोळखी व्यक्तीसोबत फोनवर बोलताना एखादा सपोर्टेड फाइनेंशियल अॅप ओपन करतो, तेव्हा यूजर्सचे अँड्रॉईड हँडसेट संभाव्य धोक्यांबद्दल यूजर्सना अलर्ट पाठवते. हे फीचर यूजर्सना तात्काळ कॉल बंद करण्याचा ऑप्शन देखील देतो. गूगलचं असं म्हणणं आहे की, अलर्टमध्ये यूजर्सना स्क्रीन शेअर करण्यापूर्वी किंवा सपोर्टेड फाइनेंशियल अॅप ओपन करण्यापूर्वी 30 सेंकंदांचा पॉज पीरियड दिला जातो. ज्यामुळे यूजर्सना पुन्हा एकदा विचार करण्याची संधी दिली जाते. यामुळे तुम्हाला स्कॅमरच्या सोशल इंजिनिअरिंगच्या जाळ्याला तोडण्यासाठी थोडा वेळ मिळतो.
गूगलने या वर्षाच्या सुरुवातीला यूकेमध्ये फाइनेंशियल अॅप्ससाठी इन-कॉल प्रोटेक्शन मिळावे, यासाठी एक पायलट लाँच केला होता. कंपनीने दावा केला आहे की, त्यांनी हजारो यूजर्सना संशयास्पद कॉल थांबवण्यास सांगून संभाव्य घोटाळे टाळण्यास मदत केली आहे. गूगलने ब्राझील आणि भारतीय बाजारांमध्ये अशाच प्रकराचे पायलट लाँच केले आहेत.
Ans: स्कॅम प्रोटेक्शन हे स्मार्टफोन्समधील सुरक्षा फीचर आहे जे फसवणूक करणारे कॉल, SMS, अॅप्स आणि लिंक्स ओळखून तुम्हाला वॉर्निंग देते.
Ans: हे AI, नेटवर्क डिटेक्शन, स्पॅम डेटाबेस आणि कॉल/SMS पॅटर्न्स यांच्या आधारे संशयास्पद अॅक्टिव्हिटी ओळखते आणि युजरला अलर्ट करते.
Ans: फोन ऑटोमॅटिक नंबर स्कॅन करून स्पॅम म्हणून फ्लॅग करतो. “फ्रॉड” किंवा “सस्पिशस” असे स्क्रीनवर दिसते.