Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या स्मार्टफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता WhatsApp वर होणार सॅटेलाइट नेटवर्क कॉलिंग, 28 ऑगस्टपासून रोलआऊट होणार फीचर

WhatsApp Update: अलीकडेच लाँच करण्यात गुगलच्या नव्या स्मार्टफोन सिरीजसाठी आता कंपनी एक नवीन अपडेट जारी करणार आहे. हे अपडेट या स्मार्टफोन्समधील WhatsApp साठी असणार आहे. हे अपडेट युजर्ससाठी अतिशय फायद्याचं ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 24, 2025 | 10:01 AM
या स्मार्टफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता WhatsApp वर होणार सॅटेलाइट नेटवर्क कॉलिंग, 28 ऑगस्टपासून रोलआऊट होणार फीचर

या स्मार्टफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता WhatsApp वर होणार सॅटेलाइट नेटवर्क कॉलिंग, 28 ऑगस्टपासून रोलआऊट होणार फीचर

Follow Us
Close
Follow Us:

20 ऑगस्ट रोजी गुगलचा Made by Google ईव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांचे अनेक डिव्हाईस लाँच केले आहे. ज्यामध्ये फ्लॅगशिप Pixel 10 सीरीजचा देखील समावेश आहे. या सिरीजची युजर्सना गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा होती. आता अखेर ही सिरीज लाँच करण्यात आली आहे. आता कंपनीने या सिरीजसाठी एक नवीन फीचर जारी करणार असल्याची घोषणा केली आहे.

WhatsApp Update: आता इंस्टाग्राम अकाऊंटला लिंक करा तुमचं मेसेजिंग अ‍ॅप, बीटा यूजर्ससाठी लवकरच रोल आऊट होणार धमाकेदार फीचर

गुगलने घोषणा केली आहे की, Pixel 10 सीरीजमधील WhatsApp साठी एक नवीन फीचर रिलीज केलं जाणार आहे. हे फीचर WhatsApp मधील व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी असणार आहे. हे फीचर सॅटेलाइट नेटवर्कद्वारे काम करणार आहे. याचा अर्थ असा की तुमच्याकडे मोबाईल नेटवर्क किंवा वाय-फाय कनेक्शन नसतानाही तुम्ही कॉल करू शकाल. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Google Pixel 10 वर सॅटेलाइट बेस्ड WhatsApp कॉल

गूगलने या सॅटेलाइट -बेस्ड कम्युनिकेशन फीचरबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर घोषणा केली आहे. Pixel 10 सीरीजमधील फोन्सवर 28 ऑगस्टपासून WhatsApp व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल सॅटेलाइट नेटवर्कद्वारे सपोर्ट करणार आहेत. 28 ऑगस्ट रोजी Pixel 10 सीरीज स्मार्टफोन्स बाजारात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.

एक्सवर एक टिझर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, हे फीचर कसं काम करणार आहे. जेव्हा तुम्हाला सॅटेलाइट नेटवर्कवर WhatsApp कॉल येतो तेव्हा स्टेटस बारमध्ये सॅटेलाइट आयकॉन दिसेल. यानंतर, यूजर्स सामान्य पद्धतीने व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल प्राप्त करू शकतील, फरक एवढाच असेल की हा कॉल मोबाइल नेटवर्क किंवा वाय-फाय ऐवजी सॅटेलाइट नेटवर्कवर कनेक्ट केला जाईल. तसेच, गुगलने स्पष्ट केलं आहे की, यासाठी काही अटी आणि शर्ती लागू होतील. सर्वप्रथम, हे वैशिष्ट्य फक्त पार्टिसिपेटिंग कॅरियर्ससह कार्य करेल. याशिवाय, यूजर्सना ही सेवा वापरण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते.

कंपनीने हे फीचर रिलीज केल्यानंतर गुगल Pixel 10 सीरीज ही जगातील पहिला अशी स्मार्टफोन सीरीज असणार आहे, जी WhatsApp वर सॅटेलाइट-बेस्ड कॉलिंग सपोर्ट करणार आहे. WhatsApp सॅटेलाइट नेटवर्कद्वारे टेक्स्ट मेसेज पाठवण्याची सुविधा देखील देईल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र या सॅटेलाईट नेटवर्कद्वारे युजर्स व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग करू शकणार आहेत. सध्या हे स्पष्ट आहे की मेसेजिंग सेवा सॅटेलाइट-आधारित कम्युनिकेशनद्वारे अशा ठिकाणी काम करतात जिथे मोबाईल नेटवर्क किंवा वाय-फाय नाही.

Itel Zeno 20: 5,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला हा सुपर स्मार्टफोन, Aivana 2.0 AI वॉइस असिस्टेंट आणि IP54 रेटिंगने सुसज्ज

हे फीचर Pixel 10 मधील लेटेस्ट सॅटेलाइट-बेस्ड कम्युनिकेशन अपडेटवर आधारित आहे, जे मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये सादर करण्यात आले होते. कंपनीच्या मते, Pixel 10 युजर्स फाइंड हब किंवा गुगल मॅप्सद्वारे सॅटेलाइटद्वारे त्यांचे स्थान देखील शेअर करू शकतात. Skylo नावाच्या नॉन-टेरेस्टेरियल प्रोवाइडर कंपनीसह गुगलच्या पार्टनरशिपमुळे हे वैशिष्ट्य काम करत आहे.

Web Title: Google pixel 10 series phones planning to release new features so that voice and video calls on whatsapp via satellite will be possible

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 10:01 AM

Topics:  

  • google pixel
  • Tech News
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Apple Vision Pro ला टक्कर देण्यासाठी विवो सज्ज, पहिला मिक्स्ड रियलिटी हेडसेट लाँच; असे आहेत स्पेसिफिकेशन्स
1

Apple Vision Pro ला टक्कर देण्यासाठी विवो सज्ज, पहिला मिक्स्ड रियलिटी हेडसेट लाँच; असे आहेत स्पेसिफिकेशन्स

WhatsApp Update: आता इंस्टाग्राम अकाऊंटला लिंक करा तुमचं मेसेजिंग अ‍ॅप, बीटा यूजर्ससाठी लवकरच रोल आऊट होणार धमाकेदार फीचर
2

WhatsApp Update: आता इंस्टाग्राम अकाऊंटला लिंक करा तुमचं मेसेजिंग अ‍ॅप, बीटा यूजर्ससाठी लवकरच रोल आऊट होणार धमाकेदार फीचर

HMD Fuse: आता स्मार्टफोनमध्ये मिळणार खास पॅरेंटल कंट्रोल फीचर, या कंपनीने केली कमाल! 108MP कॅमेऱ्यासह लाँच केलं डिव्हाईस
3

HMD Fuse: आता स्मार्टफोनमध्ये मिळणार खास पॅरेंटल कंट्रोल फीचर, या कंपनीने केली कमाल! 108MP कॅमेऱ्यासह लाँच केलं डिव्हाईस

Grok Chat Leaked: एलन मस्कची हत्या कशी करू… गुगलवर लिक झाले Grok युजर्सचे चॅट, सर्वत्र उडाला गोंधळ!
4

Grok Chat Leaked: एलन मस्कची हत्या कशी करू… गुगलवर लिक झाले Grok युजर्सचे चॅट, सर्वत्र उडाला गोंधळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.