Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संपता संपणार नाही बॅटरी! Google च्या नव्या TWS ईयरबड्सची जबरदस्त एंट्री, तब्बल 27 तासांची बॅटरी लाईफ; भारतात इतकी आहे किंमत

Google Pixel Buds 2a: आकर्षक डिझाईन आणि कूल रंग... प्रिमियम रेंजमध्ये गुगलने त्यांचे नवीन ईअरबड्स लाँच केले आहेत. Google Pixel Buds 2a या नावाने हे ईअरबड्स लाँच करण्यात आले असून त्याचे फीचर्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 22, 2025 | 02:53 PM
संपता संपणार नाही बॅटरी! Google च्या नव्या TWS ईयरबड्सची जबरदस्त एंट्री, तब्बल 27 तासांची बॅटरी लाईफ; भारतात इतकी आहे किंमत

संपता संपणार नाही बॅटरी! Google च्या नव्या TWS ईयरबड्सची जबरदस्त एंट्री, तब्बल 27 तासांची बॅटरी लाईफ; भारतात इतकी आहे किंमत

Follow Us
Close
Follow Us:

Google Pixel Buds 2a भारतात लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने आयोजित केलेल्या Pixel 10 सीरीज स्मार्टफोन्स आणि Pixel Watch 4 सह आता Google Pixel Buds 2a देखील भारतात लाँच करण्यात आले आहे. ट्रूली वायरलेस स्टीरियो (TWS) हेडसेटबाबत असा दावा करण्यात आला आहे की, या ईअबड्सची बॅटरी 27 तासांपर्यंत चालते. यामध्ये चार्जिंग केस देखील देण्यात आले आहेत. या ईअरबड्समध्ये एक्टिव नॉइज कँसिलेशन (ANC) चा सपोर्ट आहे, जो Silent Seal 1.5 सह येतो. असं सांगितलं जात आहे की, हे फीचर ईयरबड्स यूजरच्या कानांच्या आकारानुसार एडजस्ट होतात, ज्यामुळे आरामदायक फीट मिळते. असेच फीचर Pixel Buds Pro 2 मध्ये देखील पाहायला मिळाले होते. जे आता भारत आणि जागतिक बाजारपेठेत नवीन रंग पर्यायांसह उपलब्ध आहे.

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Google Pixel Buds 2a ची किंमत

Google Pixel Buds 2a ची किंमत भारतात 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे हेजल आणि आइरिस कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टद्वारे या ईअरबड्सची विक्री केली जाणार आहे. तर Pixel Buds Pro 2 आता 22,900 रुपयांच्या किंमतीत मूनस्टोन शेड देखील खरेदीसाठी उपलब्ध आहेत. TWS हेडसेट पूर्वी देशात हेझेल, पेनी, पोर्सिलेन आणि विंटरग्रीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होता. आता, हेडफोन्सना सॉफ्टवेअर अपडेटद्वारे अ‍ॅडॉप्टिव्ह ऑडिओ सपोर्ट देखील मिळेल.  (फोटो सौजन्य – X)

Google Pixel Buds 2a चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नवीन Google Pixel Buds 2a मध्ये 11mm डायनामिक ड्राइवर्स आणि गूगलची Tensor A1 चिप आहे. यामध्ये Adaptive ANC सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यामध्ये Transparency Mode आणि Silent Seal 1.5 फीचर यांचा समावेश आहे. या TWS हेडसेटमध्ये एक्टिव इन-ईयर प्रेशर रिलीफ देखील देण्यात आला आहे.

कनेक्टिविटी ऑप्शन्स मध्ये Pixel Buds 2a मध्ये Bluetooth 5.4 सपोर्ट आहे. यामध्ये ड्यूल माइक्रोफोन आणि क्लियर कॉलिंगसाठी विंड-ब्लॉकिंग मेष कवर्स आहे. यामध्ये इन-ईयर डिटेक्शन सपोर्टसाठी IR प्रॉक्सिमिटी सेंसर देण्यात आला आहे. वायरलेस हेडसेटमध्ये कॅपेसिटिव टच कंट्रोल्स आहे आणि मॅग्नेटिक चार्जिंग केसमध्ये ओपन आणि क्लोज डिटेक्शनसाठी हॉल सेंसर आणि USB Type-C पोर्ट देखील देण्यात आले आहे.

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Pixel Buds 2a बाबत असं सांगितलं जात आहे की, हे चार्जिंग केससह ANC शिवाय 27 तासांची बॅटरी लाईफ ऑफर करतात. तर ANC ऑन असल्यास त्याचा टोटल प्लेबॅक टाईम 20 तासांचा होता. गुगलचे म्हणणे आहे की हे इअरबड्स तुम्हाला एकदा चार्ज केल्यानंतर 7 तासांपर्यंत (ANC चालू असताना) आणि 10 तासांपर्यंत (ANC बंद असताना) चालू शकतात. Pixel Buds 2a हेडसेट IP54 रेटिंगसह लाँच करण्यात आले आहे, म्हणजेच हे डिव्हाईस डस्ट आणि स्प्लॅश रेजिस्टेंट आहे. केस IPX4 रेटिंगसह येतो, म्हणजेच तो स्प्लॅश प्रतिरोधक आहे. प्रत्येक इयरफोनचे वजन 4.7 ग्रॅम आहे, तर केससह हेडसेटचे एकूण वजन 47.6 ग्रॅम आहे.

Web Title: Google pixel buds 2a launched in india know about the features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • earbuds
  • google
  • tech launch

संबंधित बातम्या

Google Pixel Watch 4: क्या बात, क्या बात! Gemini अ‍ॅक्सेस आणि हेल्थ फीचर्सने सुसज्ज… Google चं नवं स्मार्टवॉच गाजवणार मार्केट
1

Google Pixel Watch 4: क्या बात, क्या बात! Gemini अ‍ॅक्सेस आणि हेल्थ फीचर्सने सुसज्ज… Google चं नवं स्मार्टवॉच गाजवणार मार्केट

Google Pixel 10 Pro Fold: एकच झलक, सबसे अलग! Google ने उडवली सर्वांचीच झोप, फ्लॅगशिप फोल्डेबल स्मार्टफोन अखेर भारतात लाँच
2

Google Pixel 10 Pro Fold: एकच झलक, सबसे अलग! Google ने उडवली सर्वांचीच झोप, फ्लॅगशिप फोल्डेबल स्मार्टफोन अखेर भारतात लाँच

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर Google चा मोठा धमाका! Google Pixel 10 सिरीजची भारतात ग्रँड एंट्री, स्टायलिश लूक आणि आकर्षक रंग…
3

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर Google चा मोठा धमाका! Google Pixel 10 सिरीजची भारतात ग्रँड एंट्री, स्टायलिश लूक आणि आकर्षक रंग…

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
4

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.