7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर... Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
Realme ने त्यांच्या P4 सीरीज अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे दोन्ही बजेट स्मार्टफोन आहेत, हे स्मार्टफोन्स Realme P4 5G आणि Realme P4 Pro 5G या नावाने लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची विशेष गोष्ट म्हणजे या स्मार्टफोन्समध्ये अनेक जबरदस्त AI फीचर्स आणि 7,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. स्पेसिफिकेशन्सचा विचार केला तर स्मार्टफोनची किंमत अत्यंत कमी आहे.
Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
एवढेच नाही तर, तुम्हाला या डिव्हाईसमध्ये बिल्ट-इन हायपर व्हिजन चिपसेट देखील दिसेल, जो चांगला डिस्प्ले परफॉर्मन्स देईल. दोन्ही उपकरण आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर अर्ली बर्ड सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असतील. स्मार्टफोनच्या प्रो मॉडेलमध्ये डिव्हाईसमध्ये 6.8 इंच फुल-HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हे डिव्हाईस 144Hz रिफ्रेश रेट आणि 6,500 निट्सपर्यंत पीक ब्राईटनेसला सपोर्ट करते. नॉन-प्रो मॉडेलमध्ये 144Hz रिफ्रेश रेट देखील आहे परंतु त्यात थोडा लहान 6.77-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. (फोटो सौजन्य – X)
स्मार्टफोनच्या प्रो मॉडेलमध्ये डिव्हाईसमध्ये 6.8 इंच फुल-HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हे डिव्हाईस 144Hz रिफ्रेश रेट आणि 6,500 निट्सपर्यंत पीक ब्राईटनेसला सपोर्ट करते. फोनला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेनरेशन 4 प्रोसेसर देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 12GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज आहे.
डिवाइस Android 15-बेस्ड Realme UI 6 वर काम करते. डिव्हाईसमध्ये AI स्नॅप मोड, AI पार्टी मोड आणि AI टेक्स्ट स्कॅनर सारखे अनेक जबरदस्त AI फीचर्स देण्यात आले आहेत. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP चा Sony IMX896 प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या समोर 50MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
नॉन-प्रो मॉडेलच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, या डिव्हाइसमध्ये 144Hz रिफ्रेश रेट देखील आहे परंतु त्यात थोडा लहान 6.77-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. या फोनची पीक ब्राइटनेस 4,500-निट्स आहे. याशिवाय, हे डिव्हाइस मीडियाटेक 7400 चिपसेट आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह 8GB पर्यंत रॅम देत आहे. या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तर फ्रंटला 16MP फ्रंट कॅमेरा आहे.