Google भारतात AI उपक्रमाचा विस्तार करणार! भाषेतील अडथळे आणि कृषी कार्यक्षमतेवर देणार भर
प्रसिद्ध टेक कंपनी गुगलचा व्यवसाय भारतात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच आता नुकतेच गुगल कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गुगल भारतातील भाषेतील अडथळे दूर करून एआय प्रगत टूल्स सादर करण्याच्या तयारीत आहे. या उपकरणांच्या माध्यमातून देशातील कृषी संबंधित कामांना लक्ष्य करण्यात आले असून त्यांची क्षमता वाढणार आहे. गुगल डीपमाइंडचे प्रोडक्टस मॅनेजमेंटचे निर्देशक अभिषेक बापना, यांनी भाषेतील अडथळे कमी करण्याचे महत्त्व आणि भारताच्या आर्थिक वाढीसाठी ते किती महत्त्वाचे आहे यावर भाष्य केले.
IIM कोलकत्ता येथे बापना म्हणाले, ‘आर्थिक विकासात भाषेला खूप महत्त्व आहे. कोणत्याही आजारासारखी वैद्यकीय समस्या समजून भाषेचा अडथळा लपवता येत नाही, यात बँकिंग सेवांचाही समावेश आहे. टेक दिग्गज कंपनीने गुगल जिनी लाँच केला आहे. पूर्वी बार्ड नावाचा हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआय चॅटबॉट नऊ भारतीय भाषांसह चाळीसहून अधिक जागतिक भाषांसह येतो. गुगलचा सध्याचा फोकस भाषेचा दर्जा आणि व्याप्ती वाढवण्यावर असल्याचेही बापना यांनी म्हटले आहे. येत्या काळात आणखीन अनेक भारतीय भाषा यासह जोडल्या जातील.
हेदेखील वाचा – ‘अर्धा सफरचंद’च का बनला Apple कंपनीचा Logo? काय आहे त्यामागची कहाणी
सध्या चॅटबॉट एकूण नऊ भारतीय भाषांना सपोर्ट करतो. यामध्ये हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, तमिळ, तेलगू आणि उर्दूचा समावेश आहे. भारतीय भाषांच्या वातावरणाची दखल घेत बापना म्हणाले की, लोक अनेक भाषा वापरतात. बापना म्हणाले की, सध्याच्या युगात एआय मॉडेल्ससमोर एक वेगळे आव्हान आहे, शब्द समजून अचूक उत्तर देणे, यासाठी शब्दकोश आणि इतर पर्यायांची मदत घेतली जाईल. गुगलच्या वानी प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी भारतातील विकासकांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) सोबत भागीदारी केली आहे.
या प्रकल्पात विकासकांना सुमारे 58 भाषांमध्ये 14 हजार तासांचा स्पीच डेटा ऑफर केला जाईल. यामध्ये 80 जिल्ह्यातील 80 हजार वक्ते गोळा करण्यात आले आहेत. गुगलने विशेषत: भारतीय भाषांसाठी IndicGenBench सर्वसमावेशक बेंचमार्क डिझाइन सादर केले आहे. भारतातील नवीन भाषांच्या स्वरांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करणे हा या उपक्रमाचा उद्देश असणार आहे. ते भारतीय कृषी क्षेत्रालाही मदत करत आहे. गुगल कृषी लँडस्केप समजून घेण्यावर म्हणजेच ALU संशोधनावर काम करत आहे. याचा वापर मर्यादित उपलब्धतेसह शेतीशी संबंधित डेटा आणि क्षमता वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो.
बापना म्हणाले की, शेतीच्या बाबतीत आम्ही तेलंगणा सरकारसोबत पायलट प्रोजेक्टवर काम करत आहेत. हा पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर आम्ही राज्य सरकारसोबत ते मोठ्या स्तरावर आणण्यासाठी काम करू. पुढे ते म्हणाले की, गुगलचा कृषी उपक्रम दोन मोठ्या उद्दिष्टांवर केंद्रित आहे. शेतकऱ्यांची कमाई सुधारणे आणि आवश्यकतेनुसार हवामान बदलांना संबोधित करणे. बँका आणि विमा कंपन्या देखील युजर्स असू शकतात. मात्र सध्या तंत्रज्ञान त्याच्या स्तरावर चांगले काम करणे, हे आमचे उद्दिष्ट असणारा आहे.