Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google ची मोठी घोषणा! लाखो जणांनी डाऊनलोड केलेले हे अ‍ॅप्स आता Play Store वरून हटवणार

Google Play Store वरून कमी दर्जाचे आणि नॉन-फंक्शनल ॲप्स हटवले जाणार आहेत. 31 ऑगस्ट 2024 पासून या योजनेवर कामं केलं जाणार आहे. स्पॅम आणि मिनिमम फंग्शनॅलिटी पॉलिसी अपडेट करण्यासाठी Google ने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये टेक्स्ट ॲप्स, सिंगल वॉलपेपर ॲप्स अशा अ‍ॅप्सचा समावेश असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 22, 2024 | 12:42 PM
फोटो सौजन्य -freepik

फोटो सौजन्य -freepik

Follow Us
Close
Follow Us:

Play Store वरील अ‍ॅप्सबाबत Google ने आता एक मोठी घोषणा केली आहे. Google Play Store वरून कमी दर्जाचे आणि नॉन-फंक्शनल ॲप्स हटवले जाणार आहेत. 31 ऑगस्ट 2024 पासून या योजनेवर कामं केलं जाणार आहे. स्पॅम आणि मिनिमम फंग्शनॅलिटी पॉलिसी अपडेट करण्यासाठी Google ने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये टेक्स्ट ॲप्स, सिंगल वॉलपेपर ॲप्स अशा अ‍ॅप्सचा समावेश असणार आहे. युजर्सना केवळ Google Play Store वर हायर स्टँडर्डचे अ‍ॅप्स मिळावेत यासाठी हे नवीन अपडेट लाँच केलं जाणार आहे.

हेदेखील वाचा – iPhone 17 Series चे डिटेल्स लीक! जाणून घ्या किंमत आणि भन्नाट फीचर्स

Google च्या धोरणांतर्गत अशा अ‍ॅप्सना टार्गेट केलं जाणार आहे जे अत्यंत कमी कंटेटसह तयार करण्यात आले आहेत. तसेच या अ‍ॅप्सचे काही विशेष उद्दिष्ट नसेल आणि कोणत्याही विशिष्ट हेतूसाठी डिझाइन केले नसलेले ॲप्स Play Store वरून हटवले जाणार आहेत. या ॲप्समध्ये फक्त टेक्स्ट ॲप्स, सिंगल वॉलपेपर ॲप्स समाविष्ट असतील. Google ने आपल्या अपडेट दरम्यान सांगितलं की, ॲप्सनी त्यांच्या युजर्सना स्टेबल, रिस्पॉन्सिव आणि एंगेजिंज अनुभव प्रदान केला पाहिजे. पण काही अ‍ॅप्स त्यांच्या युजर्सना अशा प्रकारच्या सोयी देण्यासाठी अपयशी ठरत आहेत. त्यामुळे प्ले स्टोअरची सुरक्षा आणि प्लॅटफॉर्मची गुणवत्ता सुधारण्यासाठी कंपनीने अशा ॲप्सना काढून टाकण्याच निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये, कंपनीने धोरणाचे पालन न करणाऱ्या 2.28 दशलक्ष ॲप्सना प्लॅटफॉर्मवर प्रकाशित होण्यापासून थांबवलं होतं. याव्यतिरिक्त, कंपनीने जवळपास 200,000 ॲप सबमिशन नाकारले आहे.

Google Play Store वर काही धोकादायक अॅप्स असतात, ज्यामुळे युजर्सचं नुकसान होऊन त्यांचा डेटा लिक होऊ शकतो. युजर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील कंपनीचे हे नवीन अपडेट महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही सुध्दा Google Play Store वरून अनेक अ‍ॅप्स डाऊनलोड करता पण त्यातील काही अ‍ॅप्स तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरू शकतात. कंपनीने 2023 मध्ये असे धोकादायक अ‍ॅप्स Google Play Store वरून हटवले होते. या अ‍ॅप्समध्ये AA Kredit, Amor Cash, Guayaba Cash, Easy Credit, Cash wow, CrediBus, Flash Loan, PréstamosCrédito, Préstamos De Crédito-YumiCash, Go Crédito, Instantáneo Préstamo, Cartera grande, Rápido Crédito, Finupp Lending, 4S Cash, True Naira, Easy Cash यांचा समावेश होता. हे अॅप्स 12 Million लोकांनी डाऊनलोड केलं होतं.

हेदेखील वाचा – WhatsApp युजर्सच्या सुरक्षेची चिंता मिटली! लवकरच येणार नवीन फिचर

यानंतर काही दिवसांतच कंपनीने Google Play Store वरून तब्बल 43 मोबाईल अ‍ॅप्स हटवले होते. या अ‍ॅप्समध्ये मालवेअर किंवा व्हायरस होता. हे अ‍ॅप्स एकूण 2.5 मिलियन वेळा डाउनलोड करण्यात आलं होतं. या अ‍ॅप्सवर गुगल प्ले डेव्हलपर पॉलिसीचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. फोनची स्क्रीन बंद असतानाही हे अ‍ॅप्स जाहिराती दाखवत होते. त्यामुळे कंपनीने Google Play Store वरून हे अ‍ॅप्स हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुन्हा एकदा कंपनी Google Play Store वरून काही अ‍ॅप्स हटवण्याच्या तयारीत आहे.

Web Title: Googles big announcement these apps which have been downloaded by millions of people will now be removed from the play store

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 12:23 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.