
लॅपटॉपचा Keyboard अचानक बंद झालाय? घरच्या घरी 'या' ट्रिक्स वापरून कीबोर्ड करा दुरुस्त
कामाच्या गडबडीत असताना अचानक लॅपटॉपच्या कीबोर्डने साथ सोडली की आपली मोठी फजिती होते. अशा वेळी पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सर्व्हिस सेंटर. पण प्रत्येक वेळी कीबोर्ड खराब झाला असेलच असे नाही. अनेकदा सॉफ्टवेअरमधील किरकोळ बिघाड किंवा चुकीच्या सेटिंगमुळेही कीबोर्ड रिस्पॉन्स देणे बंद करतो. त्यामुळे घरच्या घरी काही ट्रिक्स वापराव्या, याबाबत जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
अनेकदा आपल्याकडून चुकून काही शॉर्टकट कीज दाबल्या जातात, ज्यामुळे ‘Filter Keys’ सारखे अॅक्सेसिबिलिटी फीचर्स ऑन होतात. यामुळे कीबोर्ड लॉक होतो किंवा टाईप करताना विलंब होतो. लॅपटॉपच्या सेटिंग्समध्ये जाऊन कीबोर्ड लॉक तर नाही ना. हे तपासा. हे फिचर बंद केल्यावर अनेकांचा कीबोर्ड पुन्हा पूर्ववत होतो.
हे ऐकायला अतिशय साधे वाटत असले तरी, लॅपटॉपच्या अनेक समस्यांवर हा रामबाण उपाय आहे. लॅपटॉप बराच काळ चालू राहिल्यामुळे किंवा एखादे अॅप क्रॅश झाल्यामुळे कीबोर्ड ड्रायव्हर अडकू शकतो. लॅपटॉप रीस्टार्ट केल्यावर सॉफ्टवेअर पुन्हा नव्याने लोड होते आणि कीबोर्ड व्यवस्थित चालू होऊ शकतो. बाहेरील कीबोर्ड जोडून टेस्ट करा तुमच्याकडे एखादा USB किवा ब्लूटूथ कीबोर्ड असेल, तर तो लॅपटॉपला जोडून पहा. जर बाहेरून जोडलेला कीबोर्ड नीट चालत असेल, तर याचा अर्थ लॅपटॉपच्या सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम नसून इंटरनल हार्डवेअरमध्ये बिघाड आहे. यामुळे तुम्हाला नेमकी चूक कुठे आहे. याचा अंदाज येईल.
इन्स्टॉल करा जर कीबोर्डचे ड्रायव्हर्स जुने झाले असतील किवा करप्ट झाले असतील, तरीही कीबोर्ड चालत नाही. अशा वेळी ‘Device Manager मध्ये जाऊन कीबोर्ड ड्रायव्हर अपडेट करा. किवा एकदा अन-इन्स्टॉल करून लॅपटॉप रीस्टार्ट करा. रीस्टार्ट केल्यावर सिस्टिम आपोआप योग्य ड्रायव्हर पुन्हा इन्स्टॉल करते, ज्यामुळे तांत्रिक बिघाड दूर होतो.