
Free Fire Max: नव्या ईव्हेंटच्या एंट्रीने प्लेअर्स झाले आनंदी! स्पिन करताच मिळणार प्रीमियन गन स्किन... फॉलो करा या स्टेप्स
फ्री फायर मॅक्स या लोकप्रिय गेममध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत नवीन नवीन ईव्हेंट लाईव्ह होत आहेत. आता पुन्हा एकदा प्लेअर्ससाठी एक नवीन ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटचे नाव एम 1887 रिंग ईव्हेंट असे आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेअर्सना एम 1887 सोलारिस बर्स्ट सारख्या अनेक प्रीमियन गन स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. या गन स्किन पूर्णपणे मोफत आहेत. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेअर्सना इन-गेम करेंसी डायमंड्सचा वापर करून स्पिन करावे लागणार आहे. स्पिन केल्यानंतर प्लेअर्सना अनेक दमदार रिवॉर्ड्स मिळणार आहेत. या ईव्हेंटमध्ये मिळणाऱ्या रिवॉर्ड्सची यादी जारी करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – YouTube)
फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह असलेल्या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना कोणते रिवॉर्ड्स मिळणार आहेत, याची यादी जारी करण्यात आली आहे. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 100 डायमंड्सऐवजी प्लेअर्सना केवळ 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.