
Free Fire Max: सामान्य प्लेअरपासून बनायचय Pro प्लेअर? या आहेत तुमच्यासाठी खास टिप्स
फ्री फायर मॅक्समध्ये अनेक नकाशे उपलब्ध आहेत. यामध्ये अनेक ठिकाणं अशी आहेत, जिथे प्लेअर्सना खूप चांगली लूट मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रो प्लेअर्स गेममध्ये या ठिकाणी लँड करून गेमची एक चांगली सुरुवात करतात. तुम्ही देखील ही टिप फॉलो करू शकता. गेममध्ये सर्व नकाशांवर खेळण्याचा प्रयत्न करा आणि लूट लोकेशन लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला लूटची कमी जाणवणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
या बॅटलरॉयल गेममध्ये प्रो प्लेअर्स त्यांच्या हिशोबाने कंट्रोल बटन प्लेस करतात. यामुळे प्लेअर्सना गेममध्ये पूर्णपणे कंट्रोल मिळतो आणि शत्रूंना नॉक आउट करण्यासाठी मदत होते. त्यामुळे प्रो गेमर बनण्यासाठी तुम्ही देखील कंट्रोल्स तुमच्या हिशोबाने कस्टमाइज करू शकता. त्यामुळे गेममध्ये खेळण्यात मजा येईल.
गेममध्ये सहसा प्रो प्लेअर्स सेफ झोनच्या बाहेर जात नाहीत. प्रो प्लेअर्स नेहमी सेफ झोनमध्येच राहतात. तुम्हाला देखील प्रो प्लेअर बनायचं असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये राहून तुमचा गेम खेळू शकता. या सवयीमुळे तुम्हाला गेममध्ये तुमचा रँक वाढवण्यासाठी आणि प्रो प्लेअर बनण्यासाठी या टिप्स मदत करणार आहेत.
फ्री फायर मॅक्समध्ये प्रो प्लेयर बनण्यासाठी तुमच्या टीमशी संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला गेम समजून घेण्यास आणि वेळेवर निर्णय घेण्यास मदत करेल, ज्यामुळे तुम्हाला सर्वाइव राहण्यास मदत होईल.
फ्री फायर मॅक्स हा मुख्यतः टीम फाइटबद्दल असतो. एकट्याने खेळणारे बहुतेक प्रो खेळाडू या प्रकारच्या लढायांमध्ये सहभागी होत नाहीत. तुम्हीही तेच करायला हवे.