Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधार अपडेटचा फटका! Sarathi Portal वरील तांत्रिक बिघाडामुळे हजारो अर्ज अडकले, नागरिक संतापले

आधारमधील माहिती लॉक असल्यामुळे सारथी पोर्टलवर अर्ज सादर करताना अर्जदारांना स्वतःहून वडिलांचे नाव टाकता येत नाही. त्यामुळे अर्ज सबमिट होत नसल्याने नागरिकांना वारंवार RTO कार्यालयात जावे लागत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 14, 2026 | 10:44 AM
आधार अपडेटचा फटका! Sarathi Portal वरील तांत्रिक बिघाडामुळे हजारो अर्ज अडकले, नागरिक संतापले

आधार अपडेटचा फटका! Sarathi Portal वरील तांत्रिक बिघाडामुळे हजारो अर्ज अडकले, नागरिक संतापले

Follow Us
Follow Us:
  • एक अपडेट… आणि हजारो अर्ज अडकले, नागरिकांचा संताप वाढला
  • आधार बदलानंतर अर्ज प्रक्रियेत मोठा अडथळा
  • आधार कार्डावरील पत्त्याच्या रकान्यातून वडिलांचे नाव वगळण्यात आल्यामुळे मोठ्या अडचणी
आधार कार्डच्या फॉरमॅटमध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने केलेल्या बदलाचा थेट परिणाम आता वाहन चालक परवाना काढणाऱ्या नागरिकांवर होत असल्याचे समोर आले आहे. आधार कार्डावरील पत्त्याच्या रकान्यातून वडिलांचे नाव वगळण्यात आल्यामुळे परिवहन विभागाच्या ‘सारथी’ पोर्टलवर अर्ज सादर करताना मोठ्या अडचणी येत आहेत. परिणामी यामुळे हजारो अर्ज अर्ध्यावरच अडकले आहेत.

Valentine’s Day: Instagram ची व्हॅलेंटाईन ट्रीट, स्टोरी-रील्ससाठी आले रोमँटिक फीचर्स! आता डिजिटल स्टाईलमध्ये व्यक्त करा प्रेम…

आधार कार्डच्या नवीन फॉरमॅटमध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने पत्त्याच्या रकान्यातून वडिलांचे नाव काढून टाकल्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सारथी पोर्टलवर अर्ज भरताना वडिलांचे नाव आवश्यक असते, पण आधार ई-केवायसीमधून ही माहिती मिळत नसल्याने हजारो अर्ज अर्ध्यावरच अडकले आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

परिवहन विभागाच्या नियमानुसार ऑनलाइन लायसन्स अर्ज करताना वडिलांचे नाव भरणे बंधनकारक आहे. बहुतांश नागरिक आधार ई-केवायसी माध्यमातून अर्ज भरतात. मात्र, नवीन आधार कार्डामध्ये वडिलांचे नाव स्वतंत्रपणे उपलब्ध नसल्याने ‘सारथी’ पोर्टलवर माहिती फेच करताना संबंधित रकाना रिकामा राहतो. आधारमधील माहिती लॉक असल्यामुळे नागरिकांना स्वतःहून वडिलांचे नाव टाकण्याची परवानगी मिळत नाही. परिणामी, अर्ज सबमिट होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या तांत्रिक त्रुटीमुळे नागरिकांना वारंवार आरटीओ कार्यालयांचे फेरे मारावे लागत असल्यचे पाहायला मिळत आहे. विशेषतः तरुण आणि ग्रामीण भागातील अर्जदारांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. डिजिटल इंडियाच्या काळात सर्व प्रक्रिया सुलभ होण्याऐवजी, या अडथळ्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्ची पडत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.

Apple iPhone 17e vs Google Pixel 10a: मिड रेंजमध्ये होणार शर्यत! ग्राहक कोणाला पसंती देणार? कोणाचे फीचर्स बेस्ट? वाचा सविस्तर

नागरिकांची अडवणूक थांबवण्याची मागणी

या समस्येकडे ‘महाराष्ट्र व्हिएलई संवाद’ संघटनेने लक्ष वेधले आहे, संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राज्याचे परिवहनमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. ‘सारथी’ पोर्टलमध्ये तातडीने सुधारणा करून वडिलांचे नाव मॅन्युअली भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी संघटनेचे प्रतिनिधी शंकर होला यांनी केली आहे. यासोबतच राष्ट्रीय माहिती केंद्राने सारथी सॉफ्टवेअरमध्ये तातडीने आवश्यक बदल करावेत, आधारमध्ये वडिलांचे नाव उपलब्ध नसल्यास पर्यायी आधार कागदपत्रावरील माहिती स्वीकारावी तसेच तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत नागरिकांची अडवणूक थांबवावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी परिवहन विभाग आणि केंद्र सरकार कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Aadhaar update fallout technical glitch leaves thousands of driving licence applications stuck citizens furious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • Aadhaar
  • aadhaar card
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: Cyber Attack झालाय? घाबरू नका! तुमचा डेटा आणि पैसे वाचवण्यासाठी सर्वात आधी करा ‘ही’ महत्त्वाची कामं
1

Tech Tips: Cyber Attack झालाय? घाबरू नका! तुमचा डेटा आणि पैसे वाचवण्यासाठी सर्वात आधी करा ‘ही’ महत्त्वाची कामं

गेमर्सची प्रतिक्षा लवकरच संपणार! 2026 च्या अखेरपर्यंत लाँच होणार BGMI Lite… कमी रॅम असलेल्या फोनवरही खेळता येणार गेम
2

गेमर्सची प्रतिक्षा लवकरच संपणार! 2026 च्या अखेरपर्यंत लाँच होणार BGMI Lite… कमी रॅम असलेल्या फोनवरही खेळता येणार गेम

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
3

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
4

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.