आधार कार्डसोबत कोणता नंबर लिंक आहे आठवत नाहीये? मग या सोप्या ट्रिकने शोधून काढा
आधार कार्ड हे आपल्या जीवनाचे एक मूलभूत साधन झाले आहे. आधार कार्ड हे भारतीय नागरिकांच्या ओळखीची पडताळणी करणारे दस्तऐवज आहे. आता प्रत्येक कामासाठी आपल्याला आधार कार्डची गरज भासते. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठीही आधार कार्ड उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत तुमचा सध्याचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे महत्त्वाचे आहे.
अनेकदा एखादी व्यक्ती वेगवेगळे मोबाईल नंबर वापरते. अशा स्थितीत मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केला जातो, मात्र तो आधारशी लिंक करण्यासाठी कोणता मोबाइल क्रमांक वापरला जातो हे लक्षात येत नाही. तुमचा नक्की कोणता नंबर आपल्या आधार कार्डशी लिंक आहे, हे तुम्हाला लक्षात नसेल तर एका सोप्या ट्रिकने तुम्ही ते शोधून काढू शकता. आज याविषयीची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आधार कार्ड होल्डर ईमेल आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करण्यासाठी सुविधा प्रदान करते. आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या फोनवरूनच ऑनलाइन शोधू शकता.
हेदेखील वाचा – एक नंबर डायल करताच BSNL सिम सुरू होईल! महागड्या रिचार्जपासून त्वरित सुटका, स्वस्तात मिळेल फास्ट इंटरनेट
यानंतर UIDAI कडून The mobile number you have entered is already verified with our records मेसेज पाठवला जाईल. तुम्ही एंटर केलेला नंबर आधारशी लिंक नसेल, तर तुम्ही एंटर केलेला मोबाईल नंबर आमच्या रेकॉर्डशी जुळत नाही असा मेसेज दिसेल. अशाप्रकारे, तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सर्व मोबाईल नंबरचे तपशील एक एक करून टाकू शकता. तुमचा आधार ज्या मोबाईल क्रमांकाशी लिंक असेल, त्याची माहिती तुम्हाला स्क्रीनवरील संदेशाद्वारे लगेच मिळेल.