जिओ, एअरटेल कंपन्यांनी अलीकडेच आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत. या नवीन किमती अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत. मात्र, यानंतर अनेक युजर्सनी त्यांचे नंबर पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत बीएसएनएल ही युजर्सची पहिली पसंती बनली असून सर्व युजर्स बीएसएनएलकडे वळत आहेत. बीएसएनएलदेखील या संधीचा फायदा घेत युजर्ससाठी नवनवीन सेवा घेऊन येताना दिसत आहे. यामध्ये फास्ट इंटरनेट प्रोव्हाइड करणे हे कंपनीचे पहिले आव्हान बनले आहे.
आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या नवीन अपडेट्स सांगणार आहोत , जे तुम्ही आपल्या फोनमध्ये सक्रिय करू शकता. तुम्हीही बीएसएनएलकडे वळण्याचा विचार केला असेल तर त्यासाठी सिम कार्ड सक्रिय करणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. यासाठी तुम्हाला एक नंबर डायल करावा लागेल. नंबर डायल केल्यानंतर ते तुमच्यासाठी खूप सोपे होते. चला तर मग BSNL 4G आपल्या फोनमध्ये कसे सक्रिय करायचे ते जाणून घ्या?
हेदेखील वाचा – Smartphone Tips: खराब स्मार्टफोन होईल नव्यासारखा! फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा
बीएसएनएलकडूनही लावकाराच 5 जी सेवा सुरू करण्यात येत आहे. याबाबतची चाचणीही पूर्ण झाली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वतः बीएसएनएल 5 जी द्वारे व्हिडिओ कॉल केला. दिल्लीहून आलेल्या या कॉलला बीएसएनएलला ग्रीन सिग्नल मिळाला असून आता यामुळे यूजर्सही खूप खूश झाले आहेत. माहितीनुसार, आता ते लवकरच आणले जाईल. पण त्यासाठी अजून सहा ते आठ महिने वाट पाहावी लागणार आहे. कारण याआधी कंपनीला मार्च 2025 पर्यंत देशभरात 4G नेटवर्क लाँच करावे लागणार आहे.
बीएसएनएलने मार्च 2025 ची डेडलाइन सेट केली आहे. ज्यानुसार BSNL 4G संपूर्ण देशात लाँच केले जाईल. यासोबतच कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की, आम्ही सहा ते आठ महिन्यांत 5G नेटवर्क सुरू करणार आहोत.