बीएसएनएलच्या प्लॅन्ससह होईल कमी पैशात रिचार्ज (फोटो सौजन्य - iStock)
एअरटेल, व्होडाफोन आयडिया (Vi) आणि जिओ सारख्या भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. या वाढीनंतर, बरेच युजर्स स्वस्त आणि परवडणारे पर्याय शोधत आहेत. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आतापर्यंत त्यांचे दर वाढवलेले नाहीत, यामुळेच ग्राहकांसाठी ही कंपनी योग्य पर्याय ठरतेय. जर तुम्ही बीएसएनएल सिम घेतले असेल तर ते कसे सक्रिय करायचे ते आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.
एअरटेल VI चे भाडे वाढले
३ जुलै २०२४ पासून, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया (Vi) आणि रिलायन्स जिओ यांनी त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनच्या किमती १०% ते २७% पर्यंत वाढवल्या आहेत. यामुळे वापरकर्त्यांमध्ये संताप दिसून आला. काही लोक तर बीएसएनएलकडे जाण्याचा विचार करू लागले. किंमती वाढवल्यानंतर, जिओने त्यांचे काही स्वस्त प्लॅन देखील सादर केले आहेत. दरम्यान यावर्षी किमती कमी केल्याने बीएसएनएलच्या तिसऱ्या तिमाहीत फायदा झालेलाही दिसून आला आहे आणि त्यामुळे अनेक ग्राहक आता BSNL कडे वळताना दिसून येत आहेत
BSNL चे स्वस्त प्लान्स
खाजगी टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे, बीएसएनएलने अद्याप त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवलेल्या नाहीत. ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे जी स्वस्त प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन देते. जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील आणि चांगली नेटवर्क सेवा हवी असेल तर बीएसएनएल हा एक उत्तम पर्याय असू शकतो. बीएसएनएलने सध्या बरेच नवे आणि स्वस्त प्लान बाजारात आणले आहेत, जे तरूण पिढीसाठी अगदी उत्तम आहेत आणि खिशाला परवडणारे आहेत, त्यामुळे महाग प्लानपेक्षा बीएसएनएलचा प्लान घेणे अनेकांसाठी फायद्याचे ठरू शकते. तसंच यासाठी काही सोप्या स्टेप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता.
Airtel ने गाठला यशाचा नवा टप्पा, मुंबई आणि चेन्नईत लाँच केली SEA-ME-WE 6 केबल; जाणून घ्या सविस्तर
How to activate BSNL SIM card
स्टेप १: सर्वप्रथम, तुमच्या मोबाईल फोनमध्ये बीएसएनएल सिम कार्ड घाला आणि फोन रीस्टार्ट करा
स्टेप २: तुमच्या फोनला नेटवर्क सिग्नल मिळेपर्यंत थोडा वेळ वाट पहा
स्टेप ३: तुमच्या फोनवर फोन अॅप उघडा आणि १५०७ वर कॉल करा
स्टेप ४: कॉल दरम्यान, तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागेल
स्टेप ५: टेली-व्हेरिफिकेशनसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करा
स्टेप ६: तुम्हाला काही इंटरनेट सेटिंग्ज मिळतील ज्या तुम्हाला सेव्ह कराव्या लागतील
स्टेप ७: आता तुमचे बीएसएनएल सिम सक्रिय झाले आहे
स्टेप ८: आता तुम्ही तुमच्या सिम कार्डने कॉल आणि इंटरनेट वापरू शकता