Galaxy A06 5G Launch: Samsung चा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच, कमी किंमतीत सुपरफास्ट कनेक्टीव्हीटी देणार ‘काम का 5G'
सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज Samsung Galaxy A06 5G च्या लाँचची घोषणा केली. कंपनीने हा स्मार्टफोन बजेट फ्रेंडली किंमतीत लाँच केला आहे. यामुळे आता ग्राहकांना किफायतशीर दरामध्ये ऑसम 5G अनुभव मिळणार आहे. ‘काम का 5G’ या टॅगलाइनसह हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. सर्वात किफायतशीर Galaxy A सिरीज 5G स्मार्टफोन Samsung Galaxy A06 5G विश्वसनीय कार्यक्षमता व दीर्घकाळपर्यंत टिकाऊपणासह ग्राहकांना अधिक मूल्य देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
Airtel ने गाठला यशाचा नवा टप्पा, मुंबई आणि चेन्नईत लाँच केली SEA-ME-WE 6 केबल; जाणून घ्या सविस्तर
आजपासून Samsung Galaxy A06 5G भारतातील सर्व रिटेल आऊटलेट्स, सॅमसंग एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स, तसेच इतर ऑफलाइन चॅनेल्समध्ये विविध स्टोरेज व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल. 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत फक्त 10499 रूपयांपासून सुरु होते. Samsung Galaxy A06 5G हा स्मार्टफोन ब्लॅक, ग्रे आणि लाइट ग्रीन या तीन रंगात लाँच करण्यात आला आहे. स्पेशल लाँच ऑफर म्हणून ग्राहक फक्त 129 रूपयांमध्ये सॅमसंग केअर+ सह एक-वर्ष स्क्रिन प्रोटेक्शन प्लॅनचा आनंद घेऊ शकतात, ज्यामधून अतिरिक्त संरक्षण व मन:शांती मिळते.
सॅमसंग इंडियाच्या एमएक्स बिझनेसचे महाव्यवस्थापक अक्षय एस. राव म्हणाले की, “Samsung Galaxy A06 5G च्या लाँचसह आम्ही उत्तम 5G अनुभवासाठी सेगमेंट-लीडिंग 12 5G बँड्स आणत आहोत. ऑसम कनेक्टीव्हीटी, शक्तिशाली कार्यक्षमता आणि सेगमेंट लीडिंग इनोव्हेशन्स देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेला हा डिवाईस सर्वांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करतो. या डिवाईससह आम्ही खात्री देत आहोत की, युजर्स काम व मनोरंजनासाठी हाय-स्पीड कनेक्टीव्हीटीसोबत अद्वितीय टिकाऊपणाचा आनंद घेऊ शकतात.”
Samsung Galaxy A06 5G मध्ये सर्व टेलिकॉम ऑपरेटर्समध्ये सुधारित नेटवर्क कनेक्टीव्हीटी आणि जलद स्पीड्ससाठी सर्व नेटवर्कची कॉम्पॅटिबिलिटी, 12 5G बँड्स आणि फिचर्स कॅरिअर अॅग्रीगेशन आहे. एमटीके डी6300 प्रोसेसरची शक्ती असलेला Samsung Galaxy A06 5G शक्तिशाली कार्यक्षमतेची खात्री देतो, तसेच मल्टीटास्किंग, गेमिंग व स्ट्रिमिंगचा उत्तम आनंद देतो. या स्मार्टफोनमध्ये जवळपास 12 जीबी रॅमसह रॅम प्लस वैशिष्ट्य आहे.
या डिवाईसमध्ये सुस्पष्ट व आकर्षक फोटोज कॅप्चर करण्यासाठी 50 मेगापिक्सल मेन रिअर कॅमेरा आणि अधिक सुस्पष्टतेसाठी 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आहे, तसेच 8 मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा उच्च दर्जाच्या सेल्फी व व्हिडिओ कॉल्सची खात्री देतो. या स्मार्टफोनमध्ये स्लीक व स्टायलिश डिझाइन आहे, तसेच व्यापक 6.7 इंच एचडी+ डिस्प्लेसोबत 20:9 अॅस्पेक्ट रेशिओच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण व्हिज्युअल अनुभवाची खात्री मिळते. या स्मार्टफोनमध्ये 5000 एचएएच बॅटरीसह बेस्ट इन सेगमेंट 25 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे.
Facebook Update: फेसबुकच्या नियमांत मोठा बदल, इतक्या दिवसांनी डिलीट होणार युजर्सचे लाईव्ह व्हिडिओ
Samsung Galaxy A06 5G अँड्रॉईड 15 आणि सॅमसंगच्या वन यूआय7 सह उपलब्ध असेल, ज्यामधून वापरकर्त्यांना आधुनिक सॉफ्वेअरचा अनुभव मिळेल. Samsung Galaxy A06 5G सह विश्वसनीयतेला नव्या उंचीवर नेत आहे, जेथे ओएस अपग्रेड्सच्या 4 जनरेशन्स आणि 4 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट्स आहेत. यामधून या सेगमेंटमधील ब्रँडची अद्वितीय कटिबद्धता दिसून येते. हे इंडस्ट्री-लीडिंग अपग्रेड्स व अपडेट्स डिवाईसला अद्ययावत ठेवण्यास आणि वापरकर्त्यांना दीर्घकाळपर्यंत वापराचा उत्साहवर्धक अनुभव देण्यास सज्ज आहेत. टिकाऊपणासाठी डिझाइन करण्यात आलेला Samsung Galaxy A06 5G आयपी 54 रेटिंगसह येतो, ज्यामधून धूळ व ओरखड्यांपासून संरक्षणाची खात्री मिळते.
सॅमसंग पहिल्यांदाच स्मार्टफोनमध्ये ‘वॉईस फोकस’ देखील सादर करत आहे. भारतात पहिल्यांदाचे हे इनोव्हेशन गोंगाटामध्ये कॉलदरम्यान सुस्पष्टपणे आवाज ऐकू येण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे, ज्यामुळे संवाद सुस्पष्ट व अधिक प्रभावीपणे करता येतात. या वैशिष्ट्यामधून भारतातील ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात येणारे अर्थपूर्ण इनोव्हेशन्स सादर करण्याप्रती सॅमसंगची कटिबद्धता दिसून येते. या डिवाईसमध्ये सॅमसंगच्या डिफेन्स-ग्रेड नॉक्स वॉल्ट सिक्युरिटीची भर करत सुरक्षितता व गोपनीयतेला प्राधान्य देण्यात आले आहे. सॅमसंग नॉक्स वॉल्ट वापरकर्त्यांना त्यांच्या डेटाचे सुरक्षितपणे व्यवस्थापन करण्यास सक्षम करते, ज्यामुळे त्यांचा स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव अधिक उत्साहपूर्ण होतो.