Google Gemini AI: सोशल मीडियावर आला AI फोटोंचा पूर, कशी कराल खऱ्या फोटोंची ओळख? जाणून घ्या
सध्या सोशल मीडियावरील ट्रेंडिंग विषय म्हणजे Google चे लेटेस्ट एआई टूल Nano Banana. सोशल मीडिया युजर्स या टूलच्या मदतीने आपले फोटो बनवून शेअर करत आहे. खरं तर सोशल मीडियावर या फोटोंचा पूर आला आहे. हायपर रियलिस्टिक 3डी फिगर, रेट्रो लुक इमेज आणि एनिमेटेड अवतार असे वेगवेगळे फोटो Google Gemini AI च्या मदतीने तयार करत आहेत. हे फोटो तयार करण्यासाठी युजर्सना सर्वात आधी त्यांचा फोटो Google Gemini AI सोबत शेअर करावा लागत आहे.
GST tax Change: AC, फ्रीज आणि TV सह हे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स झाले स्वस्त, वाचा संपूर्ण यादी
फोटो अपलोड केल्यानंतर Google Gemini AI युजर्सना अगदी काही क्षणातच त्यांचा फोटो तयार करून देते. हे फोटो अगदी खऱ्या फोटोसारखे दिसतात. त्यामुळे खरे फोटो आणि Google Gemini AI ने तयार केलेले फोटो, यातील फरक ओळखणं कठीण होत आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही Google Gemini AI च्या मदतीने तयार केलेले फोटो अगदी सहज ओळखू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
फोटोंना अगदी लक्षपूर्वक बघा – AI जेनरेटेड इमेज अगदी काळजीपूर्वक पहा. काही वेळाने तुम्हाला फरक जाणून लागेल. जेव्हा तुम्ही एखादा लक्षपूर्वक बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की तो फोटो खरा आहे की, AI जेनरेटेड आहे. हाताचे बोटे, डोळे आणि चेहऱ्याचे बारकाईने निरीक्षण करा. तसेच डोळ्यांच्या रिफ्लेक्शनने देखील तुम्ही ओळखू शकता की फोटो खरा आहे की AI जेनरेटेड आहे. AI जेनरेटेड फोटोंमध्ये अनेक डिटेल्स ब्लर दिसतात. त्यामुळे असे फोटो ओळखणं सोपं होतं.
टेक्स्ट आणि लोगो – AI जेनरेटेड फोटोंमधील टेक्स्ट आणि लोगोच्या मदतीने तुम्ही अगदी सहजपणे फरक ओळखू शकता. अनेकदा फोटोमधील टेक्स्ट AI द्वारे लिहीला जातो, मात्र तो ब्लर असतो. तसेच AI जेनरेटेड फोटोंमध्ये लोगो देखील स्पष्ट दिसत नाही. ज्यामुळे या फोटोंना ओळखणं सोपं होतं. जेव्हा तुम्हाला वाटेल की हा फोटो खरा नाही तेव्हा त्या फोटोमधील टेक्स्ट आणि लोगोचे निरीक्षण करा. यानंतर काही क्षणातच तुम्हाला फरक जाणवू लागेल.
लाइटिंग आणि शॅडो – AI जेनरेटेड फोटो जरी खरे वाटत असले तरी देखील त्यामध्ये अनेक डिटेल्सची कमतरता असते. त्यामुळे जर या डिटेल्सकडे अगदी काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला खरे फोटो आणि AI जेनरेटेड फोटोंमधील फरक दिसू लागेल. अनेकदा फोटोमध्ये ऑब्जेक्टची सावली लाइट सोर्ससोबत जुळत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही हे तपशील लक्षात घेऊन AI जनरेट केलेल्या फोटो ओळखू शकता.
मेटाडेटा – FotoForensics आणि Metadata2Go सारख्या डिजिटल टूल्सच्या मदतीने तुम्ही कोणत्याही फोटोचा मेटा डेटा चेक करू शकता. एआय-जेनरेट केलेल्या प्रतिमांमध्ये कॅमेरा आणि इतर दूसरे डिटेल आहेत.