Free Fire Max: डूडल ट्रबल बंडल मोफत मिळवण्याची ही आहे एक्सक्लूसिव संधी, गेममध्ये सुरु झाला Bye Trouble Ring ईव्हेंट
बॅटलरॉयल गेम फ्री फायर मॅक्समध्ये बाय ट्रबल रिंग ईव्हेंट एक्सक्लूसिवली सुरु झाला आहे. या ईव्हेंटद्वारे प्लेअर्सना गेममध्ये डूडल ट्रबल बंडल मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या हा ईव्हेंट काही ठरावीक प्लेअर्सना अॅक्सेस करता येत आहे. सर्व प्लेअर्ससाठी हा ईव्हेंट दोन दिवसांनी सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील गेममध्ये हा ईव्हेंट दिसत नसेल तर चिंता करू नका कारण दोन दिवसांनी तुमच्यासाठी देखील हा ईव्हेंट सुरु होणार आहे.
फ्री फायर मॅक्समध्ये अलीकडेच हॅलो ट्रबल रिंग ईव्हेंट सुरु करण्यात आला होता. या ईव्हेंटनंतर आता गेममध्ये बाय ट्रबल रिंग ईव्हेंट सुरु झाला आहे. सध्या हा ईव्हेंट काही ठरावीक प्लेअर्ससाठी लाईव्ह झाला आहे. मात्र उर्वरित प्लेअर्ससाठी हा ईव्हेंट दोन दिवसांनी लाईव्ह होणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना डूडल ट्रबल बंडल आणि मॉन्स्टर ट्रक ट्रबल गँगसारख्या स्किन मोफत मिळवण्याची एक्सक्लूसिव संधी मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाय ट्रबल रिंग ईव्हेंट काही ठरावीक प्लेअर्ससाठी सुरु करण्यात आला आहे. हा ईव्हेंट फ्री फायर मॅक्स Prime 7+ प्लेयर्स अॅक्सेस करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Free Fire)
प्राइम फ्री फायर मॅक्स गेममध्ये एक स्पेशल स्टेटस आहे. हा स्टेटस प्लेअर्स डायमंड्स अनलॉक केल्यानंतर मिळवू शकतात. Prime 1 स्टेटस मिळवण्यासाठी 100 डायमंड्स क्लेम करावे लागतात. Prime 2 स्टेटस मिळवण्यासाठी 1000 डायमंड्स क्लेम करावे लागतात. Prime 3 स्टेटस मिळवण्यासाठी 3000 डायमंड्स क्लेम करावे लागतात. Prime 4 स्टेटस मिळवण्यासाठी 10000 डायमंड्स क्लेम करावे लागतात. Prime 5 स्टेटस मिळवण्यासाठी 30000 डायमंड्स क्लेम करावे लागतात. Prime 6 स्टेटस मिळवण्यासाठी 60000 डायमंड्स क्लेम करावे लागतात. Prime 7 स्टेटस मिळवण्यासाठी 120000 डायमंड्स क्लेम करावे लागतात. Prime 8 स्टेटस मिळवण्यासाठी 200000 डायमंड्स क्लेम करावे लागतात.