Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम
फोटो, फाईल्स आणि व्हिडीओ शेअर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं गॅझेट म्हणजेच आपला स्मार्टफोन. आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने आपण केवळ कॉलिंग आणि मेसेजिंगच नाही तर फाईल्स देखील शेअर करू शकतो. फाईल शेअर करण्यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट असणं अत्यंत गरजेचं आहे. पण जर आपल्याला एखादी महत्त्वाची फाईल शेअर करायची असेल आणि आपल्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट नसेल तर? अशावेळी चिंता करण्याची गरज नाही. आता आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही इंटरनेटशिवाय देखील अगदी सहज फाईल्स शेअर करू शकता.
दोन्ही स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ ऑन करा आणि दोन्ही स्मार्टफोन पेअर करा, ज्यामुळे तुम्ही सहज फाईल शेअर करू शकता. ही प्रोसेस फोटो, गाणी आणि छोट्या डॉक्युमेंटसाठी योग्य आहे. मोठे व्हिडीओ सेंड करताना ही प्रोसेस थोडी स्लो होते. (फोटो सौजन्य – pinterest)
Wi-Fi Direct टेक्नोलॉजी इंटरनेटशिवाय फाईल पाठवण्यासाठी अगदी योग्य आहे. दोन्ही फोनमध्ये Wi-Fi Direct ऑन करा, कनेक्ट करा आणि फाइल मॅनेजर किंवा गॅलरीमधून फाइल सेंड करा
Nearby Share केवळ अँड्रॉयड डिवाइससाठी उपलब्ध आहे, या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही नियरबाय शेयर ऑन करा. ही सेटिंग अॅक्टिव्हेट झाली की तुम्ही फोटो, व्हिडीओ, अॅप्स आणि डॉक्यूमेंट अगदी सहज शेअर करू शकता.
Apple यूजर्ससाठी AirDrop सर्वात सोपी पद्धत आहे. यामध्ये वायफाय आणि ब्लूटूथ दोन्ही ऑन करा आणि जी फाईल पाठवायची आहे, ती सिलेक्ट करा आणि सेंड करा. ही पद्धत आयफोन टू आयफोनसाठी फायदेशीर आहे.
जर तुमच्याकडे OTG केबल असेल तर ही केबल तुम्ही एका फोनवरून दुसऱ्या फोनला कनेक्ट करून फाईल पाठवू शकता. ही सर्वात जलद, सोपी आणि बेस्ट पद्धत आहे.
प्लेस्टोरवर असे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही इंटरनेटशिवाय देखील फाईल सेंड करू शकता. हे अॅप्स स्थानिक इंटरनेट हॉटस्पॉट तयार करून फाइल ट्रांसफर करा. यामध्ये SHAREit (जुना), Xender, Zapya इत्यादी अॅप्सचा समावेश आहे. लक्षात ठेवा, थर्ड-पार्टी अॅप्समुळे डेटा चोरीचा धोका निर्माण होऊ शकतो.
काही अॅप्स फाइलला QR कोडमध्ये रूपांतरित करून शेअर करण्याची सुविधा देतात. दुसऱ्या फोनला फक्त तो कोड स्कॅन करावा लागतो आणि फाइल ट्रान्सफर होते.
ऑफलाइन फाइल शेयरिंग अॅप्स कोणते?
SHAREit (जुना), Xender, Zapya इत्यादी
एयरड्रॉप कोणासाठी फायदेशीर आहे?
Apple यूजर्स
अँड्रॉयड डिवाइससाठी कोणती पद्धत फायदेशीर?
नियरबाय शेयर