Gmail वरून Zoho Mail वर शिफ्ट होण्याचा विचार करताय? फॉलो करा ही स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस, मिनिटांत ट्रांसफर होईल सर्व डेटा
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी एक एक्स पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये अमित शाह यांनी जिमेल वरून Zoho Mail वर शिफ्ट झाल्याचं सांगितलं. तसेच त्यांनी या पोस्टमध्ये Zoho Mail चे कौतुक देखील केले. अमित शाह यांनी शेअर केलेल्या या पोस्टनंतर भारतीय ईमेल सर्विस Zoho Mail अतिशय वेगाने लोकप्रिय होत आहे. कोणत्याही जाहिरातीशिवाय चालणारी ही ईमेल सर्विस त्यांच्या सुरक्षा, स्वच्छ इंटरफेस आणि प्रोफेशनल फीचर्ससह लोकांची मनं जिंकत आहे.
Karwa Chauth 2025: Google Gemini ने क्रिएट करा बॉलीवुड-स्टाइल करवा चौथ पोर्ट्रेट, हे आहेत Prompts
वैयक्तिक युजर्स, छोटे व्यवयाय आणि विशेष करून टिमसाठी Zoho Mail डिझाईन करण्यात आलं आहे. हे वेब, मोबाइल आणि IMAP/SMTP सपोर्टसह येते आणि याच्यासोबत संपर्क, कॅलेंडर आणि टीम कोलॅबोरेशन सारखी अनेक टूल्स झोहो वर्कप्लेसद्वारे एकत्रित केली जातात. (फोटो सौजन्य – Pinterest)
यूजर प्रायव्हसी आणि एड-फ्री एक्सपीरियंस ही Zoho Mail ची सर्वात मोठी ताकद आहे. इथे तुम्हाला जिमेलप्रमाणे जाहिराती दिसणार नाहीत. यासोबतच ही सर्विस त्यांच्या डोमेनद्वारे कस्टम ईमेल एड्रेस तयार करण्याची सुविधा ऑफर करते, ज्यामुळे प्रोफेशनल यूजर्स आणि छोट्या व्यवसायांना एक वेगळी ओळख मिळते. कमी किंमतीत प्रीमियम लेव्हलची सिक्योरिटी आणि प्रोफेशनल टूल्स सारख्या कारणांमुळे Zoho Mail ची लोकप्रियता वाढली आहे.
जर तुम्ही Gmail वरून Zoho Mail वर शिफ्ट होण्याचा विचार करत असाल तर ही प्रोसेस अगदी सोपी आहे. यामध्ये कोणतेही डेटा, ईमेल, कॉन्टॅक्ट्स गमावणार नाहीत.
सर्वात आधी Zoho Mail च्या वेबसाईटवर जा आणि तुमच्या गरजेनुसार प्लॅनची निवड करा. जर तुम्हाला कस्टम डोमेन वापरायचे असेल, तर बिजनेस किंवा वर्कप्लेस प्लॅन निवडा. येथे तुम्ही तुमचे डोमेन जोडू शकता आणि वेरिफाई करू शकता, तसेच तुमच्या टीमसाठी अकाउंट तयार करू शकता.
आता तुमच्या Gmail अकाउंटमध्ये लॉगिन करा आणि Settings → See all settings → Forwarding and POP/IMAP सेक्शनमध्ये जा. इथे IMAP Enable करा. यामुळे Zoho Mail तुमचा जीमेल डेटा एक्सेस करू शकेल आणि ट्रान्सफर करू शकेल.
Zoho Mail च्या Settings → Import/Export सेक्शनमध्ये जा आणि Migration Wizard चा वापर करा. येथून तुम्ही तुमचे सर्व ईमेल, फोल्डर आणि संपर्क जीमेल वरून Zoho Mail मध्ये इंपोर्ट करू शकता.
जर तुम्हाला तुमच्या जीमेलवर येणारे नवीन मेसेज Zoho Mail मध्येही मिळावेत असे वाटत असेल, तर सेटिंग्ज → जीमेलमध्ये फॉरवर्डिंग वर जा, तुमचा नवीन Zoho Mail ID जोडा आणि फॉरवर्डिंग सक्रिय करा.