Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! Darkness in Bermuda ईव्हेंट LIVE, भन्नाट स्किन्स आणि रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी तयार व्हा!
फ्री फायर मॅक्समध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीच्या सणानिमित्ताने फ्री फायर मॅक्समध्ये नवीन डार्कनेस इन बरमुडा ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या जबरदस्त ईव्हेंटमध्ये गोल्ड रॉयल वाउचर आणि वॉइस पॅक रिवॉर्ड्स म्हणून मिळणार आहे. याशिवाय, या ईव्हेंटमध्ये दिवाळी फटाकेवाला ग्रेनेड देखील दिला जाणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे सर्व आयटम्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करण्याची गरज नाही. जर तुम्हाला देखील या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स जिंकायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. आता आम्ही तुम्हाला गेममधील हा ईव्हेंट आणि त्याच्या रिवॉर्ड्सबद्दल सांगणार आहोत.
फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह असलेला डार्कनेस इन बरमुडा हा एक टास्क ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना गोल्ड रॉयल वाउचर आणि वॉइस पॅक जिंकण्याची संधी मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करावे लागणार नाहीत, तर टास्क पूर्ण करावं लागणार आहे. त्यामुळे गेममध्ये तुम्ही साठवलेले डायमंड देखील वाचलीत आणि तुम्हाला आकर्षक रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत.
BR रँक्ड मॅचमध्ये एक लोटस लॅम्प क्लेट करण्यासाठी, तीन शत्रूंना नॉक आउट करण्यासाठी, 500 डॅमेज देण्यासाठी आणि 3 वेळा रँक्ड मॅच खेळण्यासाठी स्पेशल लॅम्प कॉइन मिळणार आहे. हे एक्सचेंज करून प्लेअर्स रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहेत.
फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह असलेला दिवाळी स्पेशल डार्कनेस बर्म्युडा इव्हेंट गेमर्ससाठी 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत लाईव्ह असणार आहे. दरम्यान, टास्क पूर्ण केल्यास प्लेअर्सना धमाकेदार रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. दिवाळीचा हा खास ईव्हेंट नुकताच सुरू करण्यात आला.