आता राडा तर होणारच! हटके फिचर्स आणि किंमत 10 हजार रुपयांहून कमी, HTC चा स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज
HTC Wildfire E4 Plus हा नवा बजेट स्मार्टफोन थायलँडमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. म्हणजेच जे लोकं स्वस्त आणि बजेट स्मार्टफोनच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. किंमत कमी असली तरी फीचर्सच्या बाबतीत कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. म्हणजेच तुम्हाला अनेक अनोख्या फीचर्सनी सुसज्ज असलेला स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी संधी मिळणार आहे.
HTC Wildfire E4 Plus या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे. स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, त्यामुळे सामान्य लोकं देखील सहज हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)
HTC Wildfire E4 Plus हा बजेट स्मार्टफोन सिंगल 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत थायलँडमध्ये THB 3,599 म्हणजेच सुमारे 9,747 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ब्लॅक आणि लाइट ब्लू कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात. हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
नव्या HTC Wildfire E4 Plus मध्ये 6.74-इंच फ्लॅट टचस्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामध्ये HD+ रेजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या चारही किनाऱ्यांवर थोडे मोठे बेजल देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T606 चिपसेट देण्यात आला आहे, ज्याला 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन फोनच्या उजव्या बाजूला देण्यात आले आहेत.
5,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… जबरदस्त फीचर्ससह Lava ने लाँच केला सुपर स्मार्टफोन, इतकी आहे किंमत
Wildfire E4 Plus मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी सेंसर आणि 0.3-मेगापिक्सेल सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला 8-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे, जो वाटरड्रॉप-स्टाइल नॉचमध्ये देण्यात आला आहे. बॅक कॅमेरा मॉड्यूलमध्ये डुअल LED फ्लॅश आहे, जे प्रत्येक कॅमेरा लेन्सच्या बाजूला लागले आहेत. फोन Android 14 वर चालतो. यामध्ये 4,850mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्याची जाहिरात 5,000mAh बॅटरी म्हणून केली जाते आणि ती 10W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
HTC Wildfire E4 Plus चा हा स्मार्टफोन काही महिन्यांपूर्वी गुगल प्ले कन्सोल वेबसाइटवर पहिल्यांदा दिसला होता. त्यानंतर आता हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. यात 6.5-इंच HD+ IPS डिस्प्ले आहे ज्यामध्ये 88 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आहे आणि तो MediaTek Helio P22 प्रोसेसरसह येतो.