Huawei Mate XT: जगातील पहिला ट्राय फोल्ड फोन लाँच, किंमत वाचून धक्का बसेल
Huawei ने Huawei Mate XT नावाचा पहिला ट्राय फोल्ड फोन अखेर लाँच केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासू सगळ्यांना ज्या फोनची उत्सुकता होती, तो फोन अखेर लाँच करण्यात आला आहे. Huawei Mate XT हा जगातील पहिला ट्राय फोल्ड फोन आहे. हा स्मार्टफोन उघडल्यानंतर एखाद्या टॅबलेट सारखा दिसतो आणि त्या प्रमाणे काम देखील करतो. तसेच फोल्ड केल्यानंतर पुन्हा तो एखाद्या नॉर्मल स्मार्टफोन प्रमाणे दिसतो.
हेदेखील वाचा- WhatsApp युजर्सना मिळाली सुपरपॉवर! आता चॅट्सचा लूक बदलणार, लवकरच येतय नवीन फीचर
जगातील पहिल्या Huawei Mate XT ट्राय फोल्ड स्मार्टफोनचे फीचर्स कमाल आहेत. फीचर्सप्रमाणे या फोनची किंमत देखील तेवढीच आहे. या फोनची किंमत ऐकूण नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. सर्वप्रथम आपण या ट्राय फोल्ड फोनचे फीचर्स पाहूयात. Huawei Mate XT हा ट्राय फोल्ड स्मार्टफोन Huawei चे मोठे आकर्षण ठरले आहे. (फोटो सौजन्य – Huawei)
Huawei Mate XT चे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचा ट्राय-फोल्डिंग डिझाइन डिस्प्ले आहे. हा फोन तीन भागांमध्ये दुमडून सामान्य स्मार्टफोनवरून मोठ्या टॅबलेटमध्ये बदलतो. यात 6.4-इंचाचा फ्रंट OLED डिस्प्ले आहे. जर तुम्ही हा डिस्प्ले फोल्ड एकदा उघडला तर या फोनची स्क्रीन साइज 7.9 इंच होईल आणि जर तुम्ही दुसऱ्यांदा फोल्ड उघडला तर या फोनची स्क्रीन साइज 10.2 इंच होईल आणि हा फोन पूर्णपणे टॅबलेटमध्ये बदलेल.
Huawei Mate XT हा जगातील पहिला ड्युअल हिंग हँडसेट आहे, ज्यामध्ये तीन स्क्रीन बसवण्यात आल्या आहेत. मजेदार गोष्ट म्हणजे, हा संपूर्ण फोन उघडल्यानंतर त्याची जाडी केवळ 3.6mm होते. तर फोल्ड केल्यानंतर, या स्मार्टफोनची जाडी 12.8 mm होते. हा हँडसेट चीनमध्ये सादर करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा- ‘हे’ आहेत भारतातील आवडते OTT प्लॅटफॉर्म
Huawei Mate XT मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. Huawei Mate XT मध्ये 50-MP प्रायमरी कॅमेरा असेल. सेकेंडरी कॅमेरा 12-MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह देण्यात आला आहे. 12-MP टेलिफोटो लेन्स आहे, ज्याचा ऑप्टिकल झूम 5.5x आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी हा कॅमेरा सेटअप उत्कृष्ट असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
Huawei Mate XT मध्ये Kirin 9000S चिपसेट वापरण्यात आला आहे. हा Huawei चा इनहाऊस प्रोसेसर आहे. हा प्रोसेसर Mate 60 Pro+ हँडसेटमध्ये देखील वापरण्यात आला आहे. हे डिव्हाईस HarmonyOS 4.2 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. Huawei ने यामध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरले आहे, ज्यामुळे या हँडसेटमध्ये अल्ट्रा-ड्युरेबल लॅमिनेट उपलब्ध आहे.
या हँडसेटमध्ये ड्युअल हिंग सिस्टम उपलब्ध आहे. कंपनीने या शानदार फोनमध्ये प्रोसेसरसाठी किरीन 9 चिपसेट दिला आहे, ज्यामुळे तो वेगवान आणि पॉवरफुल आहे. यात 16GB रॅमसह 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज पर्याय आहेत. हा फोन हाय-एंड गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उत्तम असल्याचा कंपनीचा दावा आहे. Huawei Mate XT EMUI 13 ऑपरेटिंग सिस्टमवर चालते, जी Android OS वर आधारित आहे.
Huawei Mate XT 5,600mAh सिलिकॉन कार्बन बॅटरी देण्यात आली आहे. जी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात 50W वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्ट आहे.
Huawei Mate XT चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 19,999 CNY (सुमारे $2,810) आहे. या फोनची भारतातील अंदाजे किंमत 2,35,000 रुपये आहे. या फोनची किंमत पाकिस्तानी चलनात रूपांतरित केली तर त्याची किंमत 7 लाख 82 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.