
व्हिज्युअल आणि एडटेक सोल्यूशन्स क्षेत्रातील अग्रगण्य जागतिक कंपनी ‘व्ह्यूसोनिक कॉर्पोरेशन’ने आज आपले सर्वात नवीन प्रीमियम इंटरअॅक्टिव्ह डिस्प्ले ‘व्ह्यूबोर्ड आयएन०४व्ही-एन सीरिज सीरिज’ लाँच करण्याची घोषणा केली. संस्था आणि शैक्षणिक संस्थांमधील संवादाच्या पद्धतीला ‘हायब्रीड कोलॅबोरेशन’ (प्रत्यक्ष आणि आभासी समन्वय) नवा आकार देत असल्याने, व्यावसायिक आणि शिक्षक अशा एकात्मिक सोल्यूशन्सचा शोध घेत आहेत जे परस्पर सहकार्य सुलभ करण्यासोबतच आकर्षक अनुभव देतील. ही वाढती गरज पूर्ण करण्यासाठी, हा नवीन व्ह्यूबोर्ड बोर्डरूम्स, क्लासरूम्स, ट्रेनिंग स्पेस आणि सहकार्यात्मक वातावरणात अखंड संवादाला गती देण्यासाठी प्रगत एआय क्षमता, एंटरप्राइज-ग्रेड परफॉर्मन्स आणि एकात्मिक ५० मेगापिक्सेल एआय कॅमेऱ्याचे संयोजन सादर करतो.
या अनुभवाच्या केंद्रस्थानी एक इंटेलिजेंट इमेजिंग सिस्टीम आहे, जी अत्यंत स्पष्ट दृश्ये प्रदान करते आणि ‘एआय फेशियल ट्रॅकिंग’द्वारे सादरीकरण करणाऱ्या व्यक्तीवर नैसर्गिकरित्या फोकस केंद्रित ठेवते. ८-मायक्रोफोन अरे हाताच्या हालचाली ओळखणे आणि आवाजाची दिशा ओळखणे या वैशिष्ट्यांसह हा डिस्प्ले आपोआप वक्त्याचा मागोवा घेतो, खोलीतील कोणत्याही कोपऱ्यातून आवाज अचूकपणे कॅप्चर करतो आणि स्पर्शविरहित संवादास सक्षम करतो. या सर्व क्षमता एकाच उपकरणात समाविष्ट केल्यामुळे, बाह्य कॅमेरे आणि अतिरिक्त ऑडिओ उपकरणांची गरज पूर्णपणे संपते, ज्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा अधिक सुलभ अनुभव मिळतो.
नविटास प्लॅनेटची जागतिक झेप! तब्बल २० दशलक्ष डॉलर्सचे आंतरराष्ट्रीय कंत्राट प्राप्त
व्ह्यूसोनिक इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंगचे व्हाईस प्रेसिडेंट, मुनीर अहमद* म्हणाले, “व्हिडिओ कोलॅबोरेशन हा आधुनिक संवादाचा पाया बनला आहे. आज संस्थांना अशा सोल्यूशन्सची आवश्यकता आहे जे अधिक सुज्ञ, अखंड आणि मीटिंग सुरू होताच तत्परतेने कार्यरत होतील. व्ह्यूबोर्ड आयएन०४व्ही-एन सीरिज च्या माध्यमातून आम्ही इनबिल्ट ५० मेगापिक्सेल एआय कॅमेरा असलेला आमचा पहिला इंटरअॅक्टिव्ह डिस्प्ले सादर करत आहोत. हा डिस्प्ले उत्कृष्ट व्हिडिओ गुणवत्ता आणि इंटेलिजेंट ट्रॅकिंग क्षमता प्रदान करतानाच इतर अतिरिक्त उपकरणांची गरज नाहीशी करतो. परस्पर सहकार्य आणि शिक्षणासाठीच्या शक्तिशाली एआय टूल्ससह सज्ज असलेली ही आयएन०४व्ही-एन सीरिज व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांना अधिक स्मार्ट व कनेक्टेड स्पेस निर्माण करण्यास मदत करेल, जिथे कल्पनांचा प्रवाह सहजपणे वाहू शकेल आणि प्रत्येक सहभागी पूर्णपणे जोडलेला राहील.”
६५-इंच, ७५-इंच आणि ८६-इंच स्क्रीन आकारांमध्ये उपलब्ध असलेला व्ह्यूबोर्ड आयएन०४व्ही-एन, मीटिंग रूममधील गुंतागुंत कमी करण्यासाठी आणि परस्पर सहकार्य सुलभ करण्यासाठी एंटरप्राइज-ग्रेड हार्डवेअरला एआय-संचालित क्षमतांशी जोडतो.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या पलीकडे जाऊन, ही नवीन सीरिज दैनंदिन कामाचा ओघ सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेल्या प्रगत एआय टूलकिटद्वारे उत्पादकता वाढवते. यातील ‘एआय टेक्स्ट रिकग्निशन पेन’ हाताने लिहिलेल्या नोट्सना त्वरित संपादन करण्यायोग्य डिजिटल टेक्स्टमध्ये रूपांतरित करतो, ज्यामुळे कल्पनांचे संकलन, नियोजन आणि सामायिकरण अधिक सोपे होते. याव्यतिरिक्त, बहुभाषिक अनुवाद, टेक्स्ट-टू-स्पीच वैशिष्ट्य आणि मजकुराचा आकार बदलणे, अलाइनमेंट कंट्रोल्स, रंग निवडणे व आकृत्यांचे संपादन (शेप एडिटिंग) यांसारखी अंतर्ज्ञानी फॉरमॅटिंग टूल्स यामध्ये उपलब्ध आहेत. वापरकर्ते मजकूर कॉपी करणे, ड्युप्लिकेट करणे, लेयर्सची पुनर्रचना करणे, ऑब्जेक्ट्स लॉक किंवा अनलॉक करणे आणि आशय डिलीट करू शकतात, ज्यामुळे कामाची पद्धत अधिक लवचिक आणि कार्यक्षम बनते.
प्रगत एआय तंत्रज्ञानासह सॅमसंगचे नवीन ‘गॅलेक्सी वॉच’ लवकरच होणार लॉन्च; जाणून घ्या काय असेल खास!
हा डिस्प्ले एआय-असिस्टेड सर्च आणि लर्निंग क्षमता देखील सादर करतो, ज्यामुळे मीटिंग्ज आणि क्लासरूम सेशन्स अधिक समृद्ध होतात. वापरकर्ते थेट यूट्यूब आणि विकिपीडियावर ओळखलेला मजकूर शोधू शकतात, तसेच शैक्षणिक आशयासाठी स्पष्टीकरण आणि लर्निंग चॅलेंजेस तयार करू शकतात. यातील ‘मॅजिकल पेन’ कच्च्या स्केचेसला सुबक ज्यामितीय आकृत्यांमध्ये रूपांतरित करतो आणि साध्या ड्रॉइंग्जचे तपशीलवार एआय-जनरेटेड व्हिज्युअल्समध्ये रूपांतर करतो. याला पूरक म्हणून ‘शेप रिकग्निशन’ हे वैशिष्ट्य हाताने काढलेल्या भूमितीय आकृत्यांना आपोआप स्वच्छ आणि व्यावसायिक रूप देते, ज्यामुळे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स, प्रेझेंटेशन्स आणि क्लासरूममधील संवाद अधिक आकर्षक बनतात.
‘अँड्रॉइड १४ ईडीएलए’ जे १६ पर्यंत अपग्रेड करण्यायोग्य आहे) वर आधारित, ‘व्ह्यूबोर्ड आयएन०४व्ही-एन’मध्ये ‘आयआर मल्टी-टच फ्रेम’सह ‘४के अल्ट्रा एचडी डिस्प्ले’ दिला आहे. तसेच, ‘आर्म कॉर्टेक्स-ए७२×४’ आणि ‘कॉर्टेक्स-ए५३×४’ आर्किटेक्चरवर आधारित ‘आरके३५७६ प्रोसेसर’, वेगवान ‘मल्टीटास्किंग’साठी ‘८जीबी एलपीडीडीआर५ रॅम’ आणि ‘१२८जीबी ईएमएमसी स्टोरेज’ दिले आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये ६० हर्ट्झवर ३८४० × २१६० पर्यंत सपोर्ट करणारा ‘एचडीएमआय इनपुट’, सर्व चॅनेलशी सुसंगत ‘स्मार्ट युएसबी पोर्ट’, ‘४के ६० हर्ट्झ डिस्प्ले’साठी ८०-पिन ‘ओपीएस सपोर्ट’, ‘इनबिल्ट स्पीकर्स’ आणि जलद व सुरक्षित प्रवेशासाठी ‘एनएफसी’ तंत्रज्ञान समाविष्ट आहे.
या नवीन व्ह्यूबोर्ड सीरिजच्या लॉन्चसह, व्ह्यूसोनिकने आपल्या एआय-सक्षम व्हिज्युअल सोल्यूशन्सच्या पोर्टफोलिओचा विस्तार सुरू ठेवला आहे, जो परस्पर सहकार्य सुलभ करतो आणि संस्थांना अधिक कनेक्टेड, उत्पादक तसेच भविष्यासाठी सज्ज मीटिंग आणि लर्निंग एनवायरनमेंट तयार करण्यास मदत करतो.
व्ह्यूबोर्ड आयएन०४व्ही-एन सीरिज संपूर्ण भारतात व्ह्यूसोनिकच्या अधिकृत भागीदारांमार्फत आणि एंटरप्राइज सेल्स नेटवर्कद्वारे खरेदीसाठी उपलब्ध होईल.