Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day Offer: स्वातंत्र्यदिनानिमित्त सॅमसंगची खास ऑफर; स्मार्ट घरासाठी AI उपकरणांवर आकर्षक सवलती

Independence Day Offer: स्वातंत्र्यदिनानिमित्त सॅमसंग इंडियाने 'द बिग बीस्पोक AI फेस्ट' ही विशेष ऑफर जाहीर केली असून ती 15 ऑगस्ट 2026 पर्यंत उपलब्ध असेल. या ऑफरअंतर्गत AI तंत्रज्ञानावर आधारित रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि वॉशर-ड्रायर कॉम्बोसह विविध स्मार्ट गृहउपकरणांवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 06, 2026 | 05:31 PM
Independence Day Offer: स्वातंत्र्यदिनानिमित्त सॅमसंगची खास ऑफर (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Independence Day Offer: स्वातंत्र्यदिनानिमित्त सॅमसंगची खास ऑफर (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सॅमसंगचा ‘द बिग बीस्पोक AI फेस्ट’ 15 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू राहणार.
  • AI-आधारित रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि वॉशर-ड्रायरवर विशेष ऑफर्स.
  • स्मार्ट उपकरणांमुळे घरातील कामे अधिक सोपी आणि वेळेची बचत होण्यास मदत.
 

Samsung Big Bespoke AI Fest 2026: स्वातंत्र्यदिन जवळ आला की बाजारात विविध कंपन्यांकडून खास ऑफर्सची रेलचेल सुरू होते. याच पार्श्वभूमीवर सॅमसंग इंडियाने ग्राहकांसाठी एक ऑफर देऊन आले आहे, या ऑफरचं नाव ‘द बिग बीस्पोक AI फेस्ट’ असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन घरातील दैनंदिन कामे अधिक सोपी करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. ही विशेष ऑफर 15 ऑगस्ट 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे.

घरकाम होणार अधिक सोपे

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला वेळेची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत स्मार्ट उपकरणे मोठी मदत ठरू शकतात. सॅमसंगने एआय तंत्रज्ञानावर आधारित रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि वॉशर-ड्रायर कॉम्बो बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. ही उपकरणे वापरकर्त्यांच्या गरजा ओळखून काम अधिक जलद आणि सोयीस्कर पद्धतीने करण्यास मदत करतात. यामुळे घरातील अनेक कामांवर लागणारा वेळ कमी होतो आणि कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळते. (Independence Day Offer:)

कॅशबॅकची आकर्षक संधी

या विशेष मोहिमेदरम्यान निवडक बीस्पोक एआय उत्पादनांवर ग्राहकांना १९,४७० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. स्वातंत्र्याच्या वर्षाची आठवण जपण्यासाठी ही रक्कम खास ठेवण्यात आली आहे. मोठ्या सवलतीमुळे नवीन स्मार्ट उपकरणे खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही योग्य संधी मानली जात आहे.

वॉरंटीमध्येही अतिरिक्त फायदा

केवळ सवलतच नाही, तर उत्पादनांच्या सुरक्षिततेचीही कंपनीने काळजी घेतली आहे. निवडक रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनवर नियमित वॉरंटीसोबत अतिरिक्त दोन वर्षांची मोफत वॉरंटी दिली जात आहे. याशिवाय काही निवडक सिंगल-डोअर रेफ्रिजरेटरसाठी फक्त ९९ रुपयांत एक वर्षाची अतिरिक्त वॉरंटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना दीर्घकाळ निश्चिंतपणे उत्पादनांचा वापर करता येणार आहे.

(EMI) ईएमआयची सोपी सुविधा

महागडी उपकरणे एकरकमी खरेदी करणे अनेकांना शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन सॅमसंगने ग्राहकांसाठी सोपे आर्थिक पर्याय उपलब्ध केले आहेत. झिरो डाऊन पेमेंटची सुविधा देण्यात आली असून, ईएमआयची सुरुवात दरमहा ८९० रुपयांपासून होते. त्यामुळे कमी खर्चात आधुनिक उपकरणे घरात आणणे अधिक सोपे झाले आहे.

वॉशर-ड्रायरवर खास लाभ

25 किलो क्षमतेच्या वॉशर-ड्रायर कॉम्बोवर ग्राहकांना आणखी एक विशेष फायदा मिळणार आहे. 20 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआय योजनेत पहिला हप्ता कंपनीकडून भरला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एका ईएमआयचा खर्च वाचणार आहे. ही ऑफर मोठ्या कुटुंबांसाठी आणि नवीन उपकरणे खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

eSIM की फिजिकल SIM? नवीन फोन घेण्यापूर्वी दोन्हीमधला फरक नक्की समजून घ्या….

स्मार्ट तंत्रज्ञानाची वाढती पसंती

गेल्या काही वर्षांत एआयवर आधारित घरगुती उपकरणांची मागणी वाढली आहे. वेळ वाचवणे, वीजेचा कार्यक्षम वापर आणि सोपे नियंत्रण यामुळे ग्राहकांचा कल अशा उत्पादनांकडे वाढताना दिसत आहे. सॅमसंगही याच गरजा लक्षात घेऊन स्मार्ट होम तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

Delhi Mobile Cover Market: 50 पासून मिळतात ट्रेंडी मोबाईल कव्हर्स! दिल्लीतील ‘हे’ मार्केट आहे ग्राहकांचे फेव्हरेट

ऑफर किती दिवस उपलब्ध?

ही विशेष स्वातंत्र्यदिन मोहीम १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. या काळात ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत विक्री केंद्रांमधून तसेच अधिकृत रिटेल भागीदारांकडून या ऑफर्सचा लाभ घेता येईल. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने घरातील जुनी उपकरणे बदलून नवीन स्मार्ट तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी ही मोहीम अनेक ग्राहकांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Independence day samsung big bespoke ai fest 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Big Offers
  • Independence Day Celebration

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.