India Pakistan War: Jio, Airtel, Vi आणि BSNL साठी सरकारने जारी केले निर्देश, Emergency साठी तयार राहण्याच्या दिल्या सूचना
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. पाकिस्तानमधून करण्यात आलेल्या स्ट्राइकनंतर भारत सरकारने संपूर्ण देशात सुरक्षा वाढवली आहे. सरकारने प्रत्येक नागरिकाला अलर्ट राहण्याचा सूचना दिल्या आहेत. याशिवाय भारताने देशातील टेलिकॉम कंपन्यासाठी देखील महत्त्वाचे अलर्ट जारी केले आहेत. ज्यामध्ये देशातील खाजगी आणि सरकारी टेलिकॉम कंपन्यांना कठीण परिस्थितीसाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
देशात इमरजेंसी परिस्थिती निर्माण झाल्यास केंद्र सरकारने सर्व खाजगी आणि सरकारी टेलिकॉम ऑपरेटर्सना नेटवर्क इंफ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत. एका रिपोर्टनुसार, संचार मंत्रालयने टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर्स (TSPs) ला बॉर्डर जिल्हे आणि राज्ये आणि डिस्ट्रिक्ट लेवल इमरजेंसी ऑपरेशन सेंटर (EOCs) मध्ये नेटवर्क कोणत्याही अडथळ्याशिवाय उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
7 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये हे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रालयाने सांगितलं आहे की, अंतरराष्ट्रीय सिमांपासून किमान 100 किमी परिघात असलेल्या सर्व महत्त्वाच्या दूरसंचार प्रतिष्ठानांची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे. या सर्व साईट्सची एक यादी तयार करणं आणि वेळोवेळी ती अपडेट करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे येणाऱ्या संकटांसाठी भारत तयार असेल. टेलीकॉम डिपार्टमेंट (DoT) ने लोकल Licensed Service Area (LSA) प्रमुखांना राज्याच्या सरकारला सहकार्य करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
टेलीकॉम कंपन्यांना 2020 मध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी जारी करण्यात आलेल्या स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसेस (SOPs) चे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय कंपन्यांना त्यांच्या मोबाईल टॉवर्सवर आणि इतर महत्त्वाच्या कम्युनिकेशन प्लेसवर जनरेटर्ससाठी पर्याप्त डीजल स्टॉक रखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यामुळे वीज पूर्णपणे गेल्यानंतर देखील नेटवर्कमध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत.
नेटवर्कमध्ये कोणताही व्यतय आला तर नेटवर्क पुन्हा सुरु व्हावं यासाठी दूरसंचार सेवा पुरवठादारांना मोक्याच्या ठिकाणी दुरुस्ती पथके आणि आवश्यक पथके तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑपरेटर्सना कम्युनिकेशन टूल्स, बॅकअप लाइन्स आणि मीडिया पार्थवर कंप्रीहेंसिव टेस्टिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, ज्यामुळे इमरजेंसीच्या परिस्थितीत नेटवर्कमध्ये अडथळे निर्माण होणार नाहीत. यासोबतच इंट्रा-सर्कल रोमिंग (ICR) फीचरची तपासणी करण्याचे आणि डिजास्टर मॅनेजमेंट पॉलिसीच्या हिशोबाने अॅक्टिव्ह करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सरकाने जारी केलेल्या या निर्देशांबाबत Reliance Jio, Airtel, Vodafone Idea, BSNL आणि टेलीकॉम डिपार्टमेंट (DoT) कडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. सरकारने लागू केलेल्या या निर्देशांमुळे बॉर्डर आणि संवेदनशील भागात दळणवळण सेवांची विश्वासार्हता आणि सुरक्षितता मोठ्या प्रमाणात सुधारेल. सध्या सुरु असणारी तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने हे निर्देश जारी केले आहेत.