7 मे ला भारतात वाजणार हवाई हल्ल्याचे सायरन, यूक्रेनमध्ये नागरिकांना सतर्क करण्यासाठी केला जातोय या App चा वापर
जम्मू – काश्मीरच्या पहलगाम भागात काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला. त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात पाकिस्तानाविषयी राग आहे. पाकिस्तानने केलेल्या या हल्लानंतर आता भारताने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. संपूर्ण देश ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो क्षण आता लवकरच येणार आहे. कारण आता पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं होतं की, ज्यांनी निष्पाप भारतीयांवर हल्ला केला आहे, त्या दहशतवाद्यांना या हल्ल्याची प्लॅनिंग करणाऱ्या मास्टरमाईंडला त्यांनी कधी विचार देखील केला नसेल अशी शिक्षा दिली जाणार आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. या सुरु असलेल्या संघर्षादरम्यान आता अशी माहिती समोर आली आहे की, केंद्रीय गृह मंत्रालयने अनेक राज्यांमध्ये बुधवार 7 मे रोजी सिविल डिफेंस ड्रिल आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या 7 मे रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या मॉक ड्रिल दरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये हवाई हल्ल्यावेळी अलर्ट करणारे सायरन लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारच्या हवाई हल्ल्यादरम्यान हे सायरन वाजू लागतात, ज्यामुळे नागरिकांना अलर्ट केलं जातं आणि नागरिक सुरक्षित ठिकाणी लपू शकतात. हवाई युद्धादरम्यान नागरिकांची सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी हे सायरन अत्यंत महत्त्वाची भुमिका बजावतात.
अनेक देश असे आहेत जिथे युद्धादरम्यान नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन वाजवलं जातं. मात्र युक्रेनमध्ये नागरिकांना अलर्ट करण्यासाठी अॅपचा वापर केला जातो. गेल्या 3 वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. या ठिकाणी नागरिकांना अलर्ट करण्यासाठी अॅपचा वापर केला जातो. रशियाकडून केल्या जाणाऱ्या हवाई हल्ल्यादरम्यान नागरिकांना अलर्ट करण्यासाठी यूक्रेनमध्ये Air Alarm अॅपचा वापर केला जातो.
यूक्रेनमध्ये नागरिकांचे हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी Air Alarm App वापरला जातो. यूरोन्यूजच्या एका रिपोर्टनुसार, सरकारद्वारे डेव्हलप करण्यात आलेलं हे Air Alarm युजर्सना त्यांनी निवडलेल्या शहरात हवाई हल्ल्याचे अलर्ट जारी करतो आणि अलार्म वाजवतो. युक्रेनियन सरकारने 2020 मध्ये दिया अॅप देखील लाँच केले.
Visitukraine ब्लॉगनुसार, हा एक असा मोबाईल अॅप आहे जो तुम्हाला सिविल डिफेंस सिस्टमसाठी एयर, केमिकल, मॅन-मेड आणि इतर धोक्यांपासून वाचण्यासाठी अलर्ट जारी करतो. Air Alarm अॅप Google Play Market आणि अॅप स्टोरवर डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. यामध्ये रजिस्ट्रेशनची गरज नाही. यामध्ये युजर्सचा कोणताही पर्सनल डेटा कलेक्ट केला जात नाही.