केवळ 6,499 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला Lava चा ब्रँड न्यू Smartphone, 8GB रॅम आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज
टेक कंपनी लावाने भारतात Lava Yuva Star 2 हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन ऑक्टा-कोर UNISOC प्रोसेसर, 5,000mAh बॅटरी आणि Android 14 Go प्लॅटफॉर्म सारख्या फीचर्सने सुसज्ज आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, फोन ब्लोटवेयर-फ्री एक्सपीरियंस ऑफर करणार आहे, ज्यामध्ये कोणताही प्री-इंस्टॉल्ड अॅप नाही. यामुळे युजर्सना क्लीन आणि सेफ यूजर इंटरफेस मिळणार आहे.
लावाने त्यांचा नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 7 हजारांहून कमी आहे. स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्ही तुमच्यासाठी एखादा एक्स्ट्रा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा स्मार्टफोन अगदी उत्तम आहे. स्मार्टफोनची डिझाईन अतिशय आकर्षक आहे. (फोटो सौजन्य – X)
Android 14 Go, Android 14 ऑपरेटिंग सिस्टमचे लाइटवेट वर्जन आहे, ज्याला विशेष करून हार्डवेयर कॅपेसिटीवाले एंट्री-लेवल स्मार्टफोन्ससाठी डिझाईन करण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, 2GB RAM किंवा त्याहून अधिक रॅमवाले स्मार्टफोन्स. हे ऑप्टिमाइज्ड परफॉर्मेंस, कमी बॅकग्राउंड अॅक्टिविटी आणि Google अॅप्सच्या लाईट वर्जन्ससह स्मूथ यूजर एक्सपीरियंस ऑफर करतो. Android 14 Go महत्त्वाच्या फीचर्सना राखून ठेवता आणि स्पीड, एफिशिएंसी आणि एक्सेसिबिलिटीला प्रायॉरिटी देतो.
हा स्मार्टफोन सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB LPDDR4X रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटची किंमत 6,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन रेडिएंट ब्लॅक आणि स्पार्कलिंग आइवरी कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन निवडक रिटेल आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
8/
Lava Yuva Star 2 with 5,000mAh battery, Android Go launched at ₹6,499
– 6.75-inch HD+ Display
– Octa-core UNISOC processor
– 4GB LPDDR4X RAM (with additional 4GB virtual RAM)
– 64GB storage
– 13MP primary rear camera
– 5MP front camera
– 5,000mAh battery
– 10W wired… pic.twitter.com/Jw5ZGq9lQt— Mukul Sharma (@stufflistings) May 5, 2025
Yuva Star 2 मध्ये 6.75-इंच HD+ डिस्प्ले आणि ग्लॉसी रियर डिझाइन देण्यात आलं आहे.
या स्मार्टफोनमध्ये 13MP प्रायमरी सेंसर आणि सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामुळे फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला होता.
Lava Yuva Star 2 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
सिक्योरिटी आणि प्रायव्हसीसाठी, स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आलं आहे. हे परफॉर्मेंस अधिक चांगला करण्यासाठी एडिशनल 4GB वर्चुअल RAM ला देखील सपोर्ट करते.