भारत लवकरच अमेरिकेला टाकणार मागे! ChatGPT-5 च्या लाँचिंगवेळी सॅम अल्टमॅनने सांगितलं असं काही... सर्वांचेच उडाले होश
बराच काळ प्रतिक्षा केल्यानंतर आता OpenAI ने त्यांचे लेटेस्ट एआई मॉडेल GPT-5 म्हणजेच ChatGPT 5 लाँच केले आहे. हे एआय मॉडेल कंपनीच्या सर्व जुन्या एआय मॉडेल्सना रिप्लेस करणार आहे, जे एडवांस इंजेलिजेंससह मार्केटमध्ये सादर करण्यात आले आहे. यासोबतच हे OpenAI च्या O-सिरीज मॉडेल्सची जागा घेईल, ज्यांना ChatGOT सिरीज असेही म्हणतात.
ओपनएआयने त्यांच्या सर्व एआय क्षमता एकत्रित केल्या आहेत आणि त्यांना एकाच इंटरफेससह सादर केले आहे. यापूर्वी, कंपनीच्या एआय मॉडेलमध्ये रिझनिंग चालू करण्यासाठी थिंक लाँगर टॉगल होता. परंतु, GPT-5 मध्ये रिझनिंग ऑटोमॅटिक करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जगभरातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या OpenAI ने त्यांचे लेटेस्ट AI मॉडेल GPT-5 लाँच केलं आहे. हे नवीन मॉडेल ChatGPT च्या फ्री आणि पेड अशा दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. एवढंच नाही तर एपीआईद्वारे डेवलपर्स देखील याचा वापर करू शकतात. ओपनएआईच्या लेटेस्ट एआई मॉडल GPT-5 बाबत असं सांगितलं जात आहे की, रीजनिंग, स्पीड, अचूकता आणि कठिण प्रश्नांची उत्तर देण्यासाठी हे एक सर्वात चांगले एआई मॉडल आहे.
ओपनएआईचे सीईओ Sam Altman ने त्यांच्या लेटेस्ट एआई मॉडलबाबत असं सांगितलं आहे की, भारतीय बाजारपेठ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अमेरिकेनंतर भारत ही त्यांची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे असे ते म्हणाले. भारत लवकरच अमेरिकेला मागे टाकून चॅटजीपीटीची सर्वात मोठी बाजारपेठ बनण्याची शक्यता आहे. सॅम ऑल्टमन म्हणाले की, भारतीय युजर्स एआयमध्ये खूप चांगले काम करत आहेत. त्यामुळे अशी शक्यता आहे की, भारत लवकरच अमेरिकेला मागे टाकून चॅटजीपीटीची सर्वात मोठी बाजारपेठ बनू शकतो.
ओपनएआईचे प्रमुख सॅम अल्टमॅन यांचं असं म्हणणं आहे की, भारतात एआईला अफोर्डेबल आणि एक्सेसिबल बनवण्यासाठी आम्ही स्थानिक भागीदारांसोबत मिळून काम करत आहोत. यावेळी सॅम अल्टमॅन सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा भारताला भेट देणार असल्याची पुष्टी करण्यात आली आहे.
GPT-5 बाबत असा दावा केला जात आहे की, आतापर्यंत लाँच करण्यात आलेल्या सर्व एआय मॉडेलच्या तुलनेत हे एआय मॉडेल सर्वाधिक इंटेलिजेंस, अधिक चांगला परफॉर्मेंस आणि स्पीड ऑफर करते. तसेच कंपनीचं असं देखील मत आहे की, हे मॉडेल काही गोष्टींमध्ये GPT4 पेक्षा कमजोर आहे. यामध्ये गणित, राइटिंग, हेल्थकेयर सारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.
GPT-5 सर्व युजर्ससाठी लाँच करण्यात आला आहे. यामध्ये Free, Plus, Pro, आणि Team या वर्जनचा समावेश आहे. ChatGPT चे फ्री यूजर्स डेली लिमिटसह याचा वापरू शकतात. OpenAI म्हणते की ते लवकरच Enterprise आणि Edu यूजर्सना देखील याचा एक्सेस देणार आहे.