Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

6000 mAh बॅटरीसह लाँच झाला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी

Infinix Smart 8 Plus लाँच झाला आहे. 8000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही या स्मार्टफोनची खरेदी करू शकता. फोनमध्ये 6000 mAh बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 19, 2024 | 11:06 PM
6000 mAh बॅटरीसह लाँच झाला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी

6000 mAh बॅटरीसह लाँच झाला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही कमी बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा किंवा तुमचा स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्यांचे बजेट 8000 रुपयांपेक्षा कमी आहे, पण त्यांना पावरफुल बॅटरीसह स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी Infinix Smart 8 Plus हा योग्य पर्याय ठरू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅमसह 128GB स्टोरेज आहे. त्याची किंमत 7800 रुपये आहे. फोनमध्ये 18W चार्जिंग सपोर्टसह 6000 mAh बॅटरी आहे.

हेदेखील वाचा- FUJIFILM ची नवी वाइड अँगल PL माऊंट झूम लेन्स लाँच, ब्रॉड कास्ट इंडिया ईव्हेंटमध्ये केली घोषणा

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी मोठ्या बजेटची गरज नाही. तुम्हाला 6000 mAh ची बॅटरी असलेला 5G स्मार्टफोन कमी किमतीत घ्यायचा असेल, तर बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आता आम्ही तुम्हाला अशा फोनबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी आहे. हे किंमतीच्या बाबतीत चांगले फीचर देते. आम्ही ज्या फोनबद्दल बोलत आहोत तो Infinix Smart 8 Plus आहे. Infinix Smart 8 Plus स्मार्टफोन टिंबर ब्लॅक,शायनी गोल्ड आणि गॅलेक्सी व्हाईट या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Infinix )

कमी किमतीत जबरदस्त फोन

Infinix Smart 8 Plus हा स्मार्टफोन 4GB+64GB आणि 4GB+128GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याची किंमत 7,799 रुपये आहे. फ्लिपकार्टवरून हा स्मार्टफोन खरेदी केल्यास, तुम्ही एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकता.

प्रोसेसर

स्वस्त Infinix फोनमध्ये MediaTek Helio G36 प्रोसेसर आहे, जो दैनंदिन वापरासाठी चांगला आहे. हे PowerVR GE8320 GPU सह जोडलेले आहे.

डिस्प्ले

Infinix स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले आहे, जो 90 Hz रिफ्रेश रेट आणि 500 ​​nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. याचे रिझोल्यूशन 720×1612 पिक्सेल आहे.

हेदेखील वाचा- Samsung Galaxy A16 भारतात लाँच, 6 वर्षांचे OS अपडेट आणि 5000 mAh बॅटरीसह झाली एंट्री

कॅमेरा

Infinix स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर 50MP AI LENS कॅमेरा आहे. फोनमध्ये 0.08MP ऑक्झिलरी लेन्स आहे, तर सेल्फीसाठी समोर 8MP सेन्सर आहे.

रॅम आणि स्टोरेज

Infinix स्मार्टफोन 4GB LPDDR4X रॅम आणि 64GB/128GB स्टोरेजसह येतो.

बॅटरी

सर्वात खास गोष्ट म्हणजे या फोनची बॅटरी. 7800 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्हाला 6000 mAh बॅटरी मिळणार आहे. जी 18W चार्जरने चार्ज होते. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Moto G64

Moto G64 मध्ये 6,000mAh बॅटरी आहे जी 30W चार्जिंगला सपोर्ट करते. हा बजेट फोन कमी किमतीत चांगले फीचर्स देतो. त्याच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. तर त्याचा 256 जीबी व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 16,999 रुपयांना लिस्ट झाला आहे. हा स्मार्टफोन आइस लिलाक, मिंट ग्रीन आणि पर्ल ब्लू या तीन रंगांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

याशिवाय, iQOO Z9x हा एक चांगला पर्याय आहे जो 6000 mAh बॅटरीसह येतो. यात 44W चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी आहे. यात 2MP बोकेह आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे. हे टोर्नेडो ग्रीन आणि स्टॉर्म ग्रे रंगात येते. त्याची किंमतही 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे. 4GB+128GB 12,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. Moto G64 आणि iQOO Z9x देखील बजेट स्मार्टफोन आहेत.

Web Title: Infinix smart 8 plus launch with powerful battery price is less than eight thousand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 11:06 PM

Topics:  

  • smartphone update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.