
itel City 300 5G (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सिटी ३०० ५जी मध्ये १२० हर्ट्झ पंच-होल डिस्प्ले आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहणं, सोशल मीडियावर स्क्रोल करणं किंवा हलकेफुलके गेम खेळणं अधिक सहज आणि प्रतिसादक्षम होतं. टी८२०० ऑक्टा-कोर ६एनएम ५जी प्रोसेसरमुळे रोजच्या कामांसाठी विश्वासार्ह परफॉर्मन्स मिळतो. अधिक चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी हा फोन एनआरसीए तंत्रज्ञानासह १० ५जी बँड्सना सपोर्ट करतो. दिवसभर चालणारी बॅटरी आणि अनावश्यक अॅप्स नसलेला इंटरफेस यामुळे फोन वापरण्याचा अनुभव स्वच्छ, सोपा आणि त्रासमुक्त राहतो. त्यामुळे फीचर्सने भरलेला, पण बजेटमध्ये बसणारा स्मार्टफोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. itel City 300
या फोनमध्ये ६.६७-इंच एचडी+ १२० हर्ट्झ पंच-होल डिस्प्ले आणि २.५डी ग्लास डिझाइन देण्यात आलं आहे. १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटमुळे स्क्रोलिंग अधिक स्मूथ होतं आणि स्क्रीनवरील हालचाली अधिक सहज दिसतात. पहिल्यांदाच साध्या फोनवरून अपग्रेड करणाऱ्या ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम फोनसारखा व्ह्यूइंग अनुभव मिळतो. फक्त ८.४एमएम जाडीच्या बॉडीमुळे फोनला आकर्षक आणि प्रीमियम लूक मिळतो.
नवीन आयटेल सिटी ३०० ५जी मध्ये टी८२०० ऑक्टा-कोर ५जी प्रोसेसर आहे. त्यामुळे जास्त पैसे खर्च न करता पहिल्यांदा अपग्रेड करणाऱ्या ग्राहकांनाही वेगवान आणि भविष्यासाठी तयार ५जी कनेक्टिव्हिटीचा अनुभव घेता येतो. ४जीबी रॅम व्हेरिएंट अॅप्स वापरणं, व्हिडिओ कॉल करणं आणि कंटेंट स्ट्रीम करणं यांसारख्या रोजच्या कामांसाठी स्मूथ अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये अल्ट्रालिंक फ्री कॉलिंगची सुविधाही आहे, ज्यामुळे बजेटचा विचार करणाऱ्या ग्राहकांना कनेक्टिव्हिटीचा आणखी फायदा मिळतो.
दैनंदिन वापर लक्षात घेऊन सिटी ३०० ५जी मध्ये ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ब्राउझिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग, कॉलिंग आणि मेसेजिंगसारख्या कामांसाठी ही बॅटरी उपयोगी ठरते. फोनमध्ये टाईप-सी चार्जिंगचा सपोर्ट असून बॉक्समध्ये १० व्हाट्स चार्जरही मिळतो. फोटोग्राफीसाठी १३एमपी ऑटोफोकस रिअर कॅमेरा आणि सेल्फी तसेच व्हिडिओ कॉलसाठी ८एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
लॉन्चबद्दल बोलताना, आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तलापात्रा म्हणाले, “टियर ३ ते टियर ५ शहरांमध्ये ५जी कनेक्टिव्हिटीची मागणी वेगाने वाढत आहे. मात्र, मर्यादित बजेटमुळे किंवा कमी किमतीच्या फोनमध्ये डिझाइन आणि स्क्रीनच्या गुणवत्तेशी तडजोड करावी लागेल, या भीतीमुळे अनेक तरुण ग्राहकांना ५जी अजूनही आवाक्याबाहेर वाटतं.
आयटेल सिटी ३०० ५जी च्या माध्यमातून आम्ही हीच अडचण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. या फोनमध्ये आम्ही प्रीमियम १२० हर्ट्झ पंच-होल डिस्प्ले, खऱ्या अर्थाने वेगवान ५जी आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी दिली आहे. दिसायला आणि वापरायला हा फोन आपल्या किमतीच्या श्रेणीपेक्षा अधिक प्रीमियम वाटतो. ग्राहकांना कोणतीही तडजोड न करता ५जीचा फायदा मिळावा, हा यामागचा उद्देश आहे.”
Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे
अँड्रॉइड १६ गो एडिशनवर चालणारा आयटेल सिटी ३०० ५जी हलका आणि स्मूथ वापराचा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. फोन पटकन अनलॉक करण्यासाठी बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय फेस अनलॉकची सुविधाही आहे. हा फोन डार्क रुबी, मिस्ट बेज आणि बोल्ड इंडिगो या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.