iPhone 17 Series: अखेर मुहूर्त ठरलाच! आगामी आयफोनची लाँच डेट Leak, कंपनीची एक चूक आणि जगाला मिळाली माहिती!
टेक जायंट कंपनीचा आगामी ईव्हेंट सप्टेंबरमध्ये आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांची बहुप्रतिक्षित आयफोन 17 सिरीज लाँच करणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासूमन कंपनीच्या या ईव्हेंटची चर्चा सुरु आहे. हा ईव्हेंट सप्टेंबरमध्ये आयोजित केला जाणार आहे, हे सांगितलं असलं तरी देखील या ईव्हेंटची नेमकी तारीख काय असणार याबाबत अद्याप माहिती समोर आली नव्हती. किंवा कंपनीने देखील याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. मात्र आता कंपनीच्या एका चुकीमुळे या ईव्हेंटची तारीख लिक झाली आहे.
टेक जायंट कंपनीच्या आगामी ईव्हेंटची तारीख आता लिक झाली आहे. या ईव्हेंटमध्ये आयफोन सिरीज लाँच केली जाणार आहे. खरं तर, कंपनीने अॅपल टीव्ही अॅपमध्ये एका कार्यक्रमाचे आमंत्रण पोस्ट केले होते. त्यावर नवीन आयफोन सिरीज लाँच करण्याची तारीख लिहिलेली होती. तथापि, कंपनीने काही वेळातच ही पोस्ट डिलीट केली, परंतु तोपर्यंत अॅपल पुढील नवीन डिव्हाइस कोणत्या तारखेला लाँच करणार आहे हे कळले होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
अॅपलच्या ईव्हेंट ईनव्हाईटनुसार, कंपनी 9 सप्टेंबर रोजी त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच करणार आहे. सहसा कंपनी त्यांच्या ईव्हेंटचे आयोजन ऑगस्ट महिन्याच्या शेवटी करते. मात्र यावेळी सप्टेंबर महिन्यात ईव्हेंटचे आयोजन केले जाणार आहे, ज्यावेळी नवीन आयफोन सिरीज लाँच केली जाणार आहे. अशा परिस्थितीत, ईव्हेंटची तारीख जाहीर करणे ही कंपनीची चूक असू शकते किंवा ती एक विचारपूर्वक आखलेली रणनीती देखील असू शकते. तथापि, कंपनीने अद्याप लाँचची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
सप्टेंबर महिन्यात कंपनी त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच करणार आहे. या सिरीज अंतर्गत चार आयफोन लाँच केले जाणार आहेत. ज्यामध्ये iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max यांचा समावेश असणार आहे. टेक जगात या लाँच इव्हेंटची आतुरतेने वाट पाहिली जाते. आतापर्यंत कंपनीने त्यांच्या ऑफरबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही, परंतु अहवाल आणि लीकमधून असे दिसून आले आहे की अॅपल यावेळी चार नवीन आयफोन लाँच करेल. या ईव्हेंटमध्ये आयफोनसोबतच अॅपल वॉच आणि नेक्स्ट जेन एयरबड्स देखील लाँच केले जाणार आहेत.
आयफोन दरवर्षी त्यांच्या आयफोन सिरीजमध्ये प्लस मॉडेलचा समावेश करते. मात्र यावेळी ईव्हेंटमध्ये प्लस नाही तर एअर मॉडेल लाँच केले जाणार आहेत. यावेळी Apple iPhone लाइनअपमधून Plus मॉडेल काढून टाकणार आहे आणि त्याच्या जागी iPhone 17 Air लाँच करणार आहे. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन असेल. त्याची किंमत Plus मॉडेलपेक्षा थोडी जास्त असू शकते. असा अंदाज आहे की तो बाजारात सुमारे 94,900 रुपयांच्या किमतीत लाँच केला जाऊ शकतो.