Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Impact Expo 2026: विकसित भारता’चे स्वप्न होणार साकार! AI मुळे वाढणार जगाचा जीडीपी… क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांचा दावा

एआय समिटमध्ये क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) जागतिक अर्थव्यवस्थेसाठी दुधारी तलवार असल्याचे म्हटले आहे. २०४७ पर्यंत अर्थव्यवस्था ३० अब्ज डॉलरवर नेणे शक्य असल्याचे क्रिस्टलिना म्हणाल्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 21, 2026 | 11:04 AM
AI Impact Expo 2026: विकसित भारता'चे स्वप्न होणार साकार! AI मुळे वाढणार जगाचा जीडीपी... क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांचा दावा

AI Impact Expo 2026: विकसित भारता'चे स्वप्न होणार साकार! AI मुळे वाढणार जगाचा जीडीपी... क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांचा दावा

Follow Us
Follow Us:
  • एआयचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम
  • ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार होऊ शकते
  • एआय जागतिक आर्थिक विकासदर सुमारे एक टक्क्याने वाढवू शकते
एआयच्या वापरातून जागतिक आर्थिक विकास दरात वाढ होऊ शकते तसेच त्याचा फायदा होऊन ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार होऊ शकते, असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी शुक्रवारी व्यक्त केला. दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटमध्ये त्या बोलत होत्या. एआयचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. जलद आर्थिक विकासासह नव्या नोकऱ्या निर्माण होतील. २०४७ पर्यंत अर्थव्यवस्था ३० अब्ज डॉलरवर नेणे आणि ‘विकसित भारता’चे लक्ष्य गाठणे शक्य असल्याचे क्रिस्टलिना म्हणाल्या.

AI Impact Expo 2026: रोडवर नाही, आता आकाशात प्रवास! भारतात हवाई टॅक्सीची एंट्री, फक्त ८ मिनिटांत ३६ किमी उड्डाण

जगाची अर्थव्यवस्था वाढेल

एआयचा वापर अधिक परिणाम निर्माण करतो. आमच्या अभ्यासानुसार एआय जागतिक आर्थिक विकासदर सुमारे एक टक्क्याने वाढवू शकते. आम्हाला ही वाढ सुमारे ०.८ टक्के असण्याचा अंदाज आहे. आयएमएफने केलेल्या अभ्यासानुसार एआयच्या वापरातून जगभरात आर्थिक विकासदरात लक्षणीय वाढ होण्याची क्षमता आहे. जागतिक स्तरावर आर्थिक विकासाची गती ही कोविड महामारीपूर्वीपेक्षाही अधिक वाढू शकते. (फोटो सौजन्य – X) 

An excellent #AISummit conversation with Mariano-Florentino Cuellar, @ITUSecGen Doreen Bogdan-Martin, @johahill & @Joteo_ylm on AI’s global economic impact. Done right, AI can boost productivity & growth — but only with the right policies to unlock benefits while managing risks. pic.twitter.com/iXyH7BUxkr — Kristalina Georgieva (@KGeorgieva) February 20, 2026

जगभरात सुमारे ४० ते ६० टक्के नोकऱ्या येणार धोक्यात

आर्थिक विकासावर एआयचे सकारात्मक परिणाम असूनही नोकरी बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची भीती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही हा धोका मोजला आहे आणि तो खूप जास्त आहे. नोकऱ्यांवर एआयचा परिणाम त्सुनामीसारखा असू शकतो, जगातील सुमारे ४० टक्के नोकऱ्या एआयमुळे प्रभावित होऊ शकतात. उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये, हा आकडा ४० टक्के असू शकतो, तर विकसित देशांमध्ये, हा आकडा ६० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, असा इशारा नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिला.

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) जागतिक अर्थव्यवस्थेसाठी दुधारी तलवार

नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एआय समिटमध्ये क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) जागतिक अर्थव्यवस्थेसाठी दुधारी तलवार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, AI मुळे जागतिक जीडीपी वाढ (विकास दर) वर्षभरात 0.8 टक्के अंकांनी वाढू शकतो, ज्यामुळे कोविडपूर्वीपेक्षा वेगवान आर्थिक वाढ शक्य होऊ शकते. ही एक सर्वात चांगली संधी असल्याचे म्हणत जॉर्जिएवा यांनी सांगितलं की, जलद वाढीमुळे नवीन नोकऱ्या आणि संधी निर्माण होतील. ज्यामुळे प्रगतीचा वेग देखील वाढणार आहे.

AI Impact Expo 2026: १० लाख कोटींच्या गुंतवणूकीपासून यूपीआयच्या कौतुकापर्यंत… ईव्हेंटमध्ये काय घडलं? वाचा सविस्तर

AI मुळे जागतिक स्थरावर सुमारे 40 टक्के नोकऱ्यांवर परिणाम

यासोबतच जॉर्जिएवा यांनी एक इशारा देखील दिला आहे. आयएमएफच्या संशोधनानुसार, AI मुळे जागतिक स्थरावर सुमारे 40 टक्के नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे. एंट्री-लेवल नोकऱ्या सर्वाधिक धोक्यात आहेत. याचा परिणाम विशेषत: तरूणांवर होऊ शकतो. काही नोकऱ्या संपुष्टात येऊ शकतात, काहींचा मार्ग बदलू शकतो तर काही नोकऱ्यांसाठी अधिक कुशल लोकांची आवश्यकता असू शकते. धोरणे योग्यरित्या अंमलात आणली गेली नाहीत तर असमानता वाढण्याचा धोका आहे.

Web Title: Ai impact expo 2026 ai to boost global gdp says imf chief kristalina georgieva viksit bharat dream will comes true soon tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • AI technology
  • Artificial intelligence
  • tech event

संबंधित बातम्या

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार
1

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा
2

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा

byteXL च्या विकासाला मिळाले बूस्ट; नव्या फंडिंग फेरीत ‘एवढ्या’ दशलक्ष डॉलर्सची कमाई
3

byteXL च्या विकासाला मिळाले बूस्ट; नव्या फंडिंग फेरीत ‘एवढ्या’ दशलक्ष डॉलर्सची कमाई

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
4

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.