iPhone 17 Series Update: या आकर्षक कलर व्हेरिअंटमध्ये लाँच होणार आयफोनची नवी सिरीज, सोशल मीडियावर Video Viral
टेक जायटं कंपनी अॅपल पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच करणार आहे. ही आगामी सिरीज आयफोन 17 या नावाने लाँच केली जाणार आहे. ही सिरीज नक्की कधी लाँच केली जाणार त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र आगामी आयफोन सिरीजबाबत युजर्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याचं कारण आगामी आयफोनबाबत सोशल मीडियावर सतत अपडेट्स शेअर केले जात आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आगामी आयफोनचे कलर व्हेरिअंट शेअर करण्यात आले आहेत. असं देखील सांगितलं जात आहे की, यंदा आयफोन सिरीजमध्ये प्लस मॉडेलऐवजी एअर मॉडेल लाँच केलं जाणार आहे. हा या सिरीजमधील सर्वात स्लिम आयफोन असू शकतो. अलीकडेच Majin Bu ने त्यांच्या X अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओमध्ये iPhone 17 सीरीजचे सर्व मॉडेल्स एका टेबलवर ठेवल्याचे दिसत आहेत. या व्हिडीओद्वारे आगामी आयफोनच्या कलर व्हेरिअंटचा खुलासा करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
Majin Bu ने सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे की, ही iPhone 17 लाइनअप आहे, ज्यामध्ये नॉन-प्रो मॉडेलपासून ते प्रो मॉडेलपर्यंत आणि टेबलावर ठेवलेल्या सर्वात पातळ आयफोनपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. यावेळी सिरीजमध्ये अनेक नवीन रंग दिसू शकतात.
अलीकडेच, Macworld चा एक अहवाल देखील समोर आला आहे ज्यामध्ये टेक जर्नलिस्ट फिलिपे एस्पोसिटोने असा दावा केला आहे की, त्यांना एक इंटरनल डॉक्यूमेंट सापडला आहे जो iPhone 17 सीरीजमधील सर्व रंग पर्याय उघड करतो. यावेळी सीरीजमध्ये iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि आयफोन iPhone 17 Pro Max या मॉडेल्सचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे.
iPhone 17 Lineup
Video Credit: @NguynCn66252402 pic.twitter.com/VU9FhpZ65q
— Majin Bu (@MajinBuOfficial) August 9, 2025
आईफोन 17 हा रेगुलर आयफोन असणार आहे, जो ब्लॅक आणि व्हाइट अशा दोन क्लासिक रंगात लाँच केला जाऊ शकतो. या मॉडेलमध्ये चार नवीन ऑप्शन देखील मिळणार आहेत, ज्यामध्ये स्पेस ग्रे मध्ये स्टील ग्रे रंग देखील समाविष्ट आहे. जो एक नवीन ट्विस्ट आहे. कंपनी हे मॉडेल काळा, पांढरा, स्टील ग्रे, हिरवा, जांभळा, हलका निळा रंगात लाँच करू शकते.
एयर मॉडेलमधील लाइट ब्लू रंग MacBook Air च्या रंगाप्रमाणे असू शकतो. हे मॉडेल कंपनी ब्लॅक, वाइट, Light ब्लू, Light गोल्ड कलरमध्ये लाँच करू शकते.
आता स्कॅमर्सची खैर नाही! WhatsApp युजर्सची सुरक्षा आणखी वाढणार, नवीन ‘सेफ्टी ओव्हरव्यू’ टूल लाँच
यावेळी प्रो मॉडेलमध्ये नवीन ऑरेंज रंग हायलाइट होणार आहे. डार्क ब्लूचा शेड आयफोन 15 प्रोच्या ब्लू टायटॅनियमसारखा असू शकतो. कंपनी हे मॉडेल ब्लॅक, व्हाईट, राखाडी, गडद निळ्या, ऑरेंज रंगांमध्ये लाँच करू शकते.
iPhone 17 Pro मॅक्सचे कलर पर्याय iPhone 17 Pro प्रमाणेच असणार आहेत. ज्यामध्ये ब्लॅक, व्हाईट, ग्रे, डार्क ब्लू, ऑरेंज व्हेरिअंट्सचा समावेश असणार आहे.