फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स
गूगल पिक्सेल 11 प्रो फोल्ड 1,86,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. या डिव्हाईसमध्ये टेंसर G6 प्रोसेसर आणि 16GB रॅम देण्यात आली आहे. फोनमध्ये 6.5 इंच कवर स्क्रीन आणि 8 इंच इनर डिस्प्ले देखील मिळणार आहे. कंपनीने या फोल्डेबल फोनमध्ये स्प्लिट स्क्रीन, ड्रॅग अँड ड्रॉप आणि इंस्टंट व्ह्यु सारखे फीचर्स दिले आहेत. तसेच, या डिव्हाईसमध्ये पिक्सेल सिरीजचा एआय आणि कॅमेरा फीचर्स देखील मिळणार आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest)
आयफोन डुओसोबत थेट स्पर्धा करणाऱ्यांपैकी एक म्हणजेच सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8. याची सुरुवातीची किंमत 1,84,999 रुपये आहे. या फोनमध्ये 5.5 इंच कवर डिस्प्ले आणि 7.6 इंच इनर स्क्रीन मिळणार आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 फॉर गॅलेक्सी प्रोसेसर, 12GB रॅम आणि 4,800mAh बॅटरी दिली आहे. याचे बुक-स्टाइल फोल्डिंग डिझाईन मल्टीटास्किंग, अभ्यास आणि व्हिडीओ पाहण्यासाठी मोठी स्क्रीन उपलब्ध करून देते.
मोटोरोला रेझर फोल्डची सुरुवातीची किंमत 1,49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. काही असे स्पेसिफिकेशन्स आहेत, ज्यामुळे हा स्मार्टफोन अतिशय खास ठरतो. या डिव्हाईसमध्ये 6.6 इंच बाहेरील स्क्रीन दिली आहे. या डिव्हाईसमध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये 80W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 50MP कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. जास्त मोठी स्क्रीन, मोठी बॅटरी आणि कॅमेरा हार्डवेअरची गरज असणाऱ्या लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे.
जर तुमचे बजेट आणखी कमी असेल तर तुम्ही मोटोरोला रेझर अल्ट्रा (2026) खरेदी करण्याचा विचार करू शकता. याची किंमत 1,499 डॉलर म्हणजेच सुमारे 1,42,500 रुपये आहे. हा स्मार्टफोन फ्लिप डिझाईनमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलाईट चिप, 16GB रॅम आणि 5,000mAh बॅटरी दिली आहे. याचे कॉम्पॅक्ट डिझाईन दुसऱ्या फोल्डेबल फोनच्या तुलनेत जास्त पोर्टेबल बनवते.






