फोटो सौजन्य AI
या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांच्याभवती गुप्तहेरगिरीच्या आरोपांमुळे वाद निर्माण झाला . एका कार्यक्रमात त्यांनी एक वक्तव्य केले कि त्यांनी त्यांच्या बायकोला फसवलं आणि बाहेर एका चीनशी संबंधित स्त्री सोबत संबंध बनवले . या नंतर जगभरात आंतरराष्ट्रीय राजकारणात गदारोळ सुरु झाला .
यानंतर चीनशी संबंधित एका व्यावसायिक महिलेच्या संपर्कातून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे . या प्रकरणाची गंभीर दखल घेत एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने स्वतंत्र चौकशी सुरु केली .
एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने स्वतंत्र संचालकांची समिती आणि बाहेरील कायदेशीर तज्ज्ञांच्या मदतीने चौकशी सुरू केली आहे. जेन्सेन हुआंग यांना परदेशी गुप्तचर यंत्रणेने लक्ष्य केले होते का, तसेच या प्रकरणात कंपनीची गोपनीय माहिती धोक्यात आली होती का, याची तपासणी केली जाणार आहे. हुआंग यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.
या प्रकरणादरम्यान हुआंग यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात पत्नीशी प्रतारणा केल्याची कबुली दिली आणि कुटुंबीयांची माफी मागितली. मात्र, वैयक्तिक संबंध आणि कंपनीच्या व्यावसायिक व्यवहारांमध्ये काही संबंध होता का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. एनव्हिडियाने हुआंग यांच्यावरील विश्वास कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.
चीनने गुप्तहेरगिरीचे आरोप फेटाळून लावत त्यांना निराधार आणि बदनामीकारक ठरवले आहे. दुसरीकडे, या वादाचा परिणाम एनव्हिडियाच्या शेअर्सवर दिसून आला. ९ नोव्हेंबर रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये व्यवहारादरम्यान सहा टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली. मात्र, कंपनीची गोपनीय माहिती किंवा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती लीक झाल्याचा कोणताही पुरावा सध्या समोर आलेला नाही.






