Flipkart Big Festival Dhamaka 2025: बिग बिलीयन डेजमधून शॉपिंग करून थकलात? फ्लिपकार्ट करणार पुन्हा नवा धमाका
Flipkart Sale 2025: अलीकडेच फ्लिपकार्ट बिग बिलीयन डेज सेल 2025 सुरु झाला होता. या सेलची अंतिम तारिख 3 ऑक्टोबर होती. बिग बिलीयन डेज सेल संपल्यानंतर आता कंपनीने एक नवीन सेलची घोषणा केली आहे. फ्लिपकार्ट बिग फेस्टिवल धमाका सेल 2025 आजपासून म्हणजेच 4 सप्टेंबरपासून सुरु झाला आहे. कंपनीच्या या धमाका सेलमध्ये आयफोन 16 सह अनेक स्मार्टफोन्सवर मोठं डिस्काऊंट उपलब्ध आहे.
जर तुम्हाला फ्लिपकार्ट बिग बिलीयन डेजमध्ये शॉपिंग करण्याची संधी मिळाली नसेल किंवा ऑफर्स शोधून तुम्ही थकला असाल तर आता धमाका सेलमध्ये तुम्ही मनसोक्त शॉपिंग करू शकणार आहात. धमाका सेलमध्ये आयफोन 16 वर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत. या ऑफर्सबद्दल आता जाणून घेऊया. धमाका सेलमध्ये तुम्ही मनसोक्त शॉपिंग करू शकणार आहात. फ्लिपकार्ट बिग फेस्टिवल धमाका सेल 2025 आजपासून सुरु झाला आहे.बिग फेस्टिवल धमाका सेलमध्ये आयफोन 16 23 हजार रुपयांनी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
बिग फेस्टिवल धमाका सेलमध्ये तुम्ही आयफोन 16 त्याच्या किंमतीपेक्षा तब्बल 23 हजार रुपयांनी कमी किंमतीत खरेदी करू शकतात. बिग फेस्टिवल धमाका सेलमध्ये आयफोन 16 ची सुरुवातीची किंमत 56,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर भारतात आयफोन 16 79,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता फ्लिपकार्ट सेलमध्ये आयफोन 16 ची किंमत 22,901 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे आयफोन 16 खरेदी करण्याची ही सर्वात चांगली संधी आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्हाला आयफोन 16 प्रो खरेदी करण्याची इच्छा असेल तर ही तुमच्याकडे शेवटची संधी आहे. खरं तर अॅपलने हे डिव्हाईस त्यांच्या वेबसाईटवरून हटवले आहे. त्यामुळे आता फ्लिपकार्टवर हा आयफोन 16 प्रो खरेदी करण्याची शेवटची संधी आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये हा सेलमध्ये हा आयफोन 16 प्रो 85,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर याची लाँचिंग किंमत 1,19,900 रुपये आहे.
फ्लिपकार्ट धमाका सेलमध्ये 16 प्रो मॅक्स मॉडलवर तब्बल 40 हजार रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे. या आयफोनचे 256GB व्हेरिअंट 1,44,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता फ्लिपकार्टवर त्याची किंमत 1,04,999 रुपये झाली आहे. याचा अर्थ असा की संपूर्ण आयफोन 16 लाइनअप सेल दरम्यान मोठ्या सवलतींवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये कॅशबॅक, सवलती आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.
आयफोन व्यतिरिक्त, या सेलमध्ये Samsung Galaxy S24, Motorola Edge 60 Fusion, Oppo K13x 5G आणि Moto G96 5G यासह इतर अनेक स्मार्टफोनवरही मोठी सूट मिळू शकते.