iQOO घेऊन येतोय 120W चार्जिंग सपोर्ट असलेले स्मार्टफोन, शक्तिशाली प्रोसेसरसह लवकरच करणार एंट्री
टेक कंपनी iQOO या महिन्याच्या अखेरीस त्यांची नवीनतम स्मार्टफोन सिरीज iQOO Neo 10 चीनमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप लाँचिंग डेट जाहीर केली नसली तरी देखील ही सिरीज या महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये लाँच होऊ शकते असं सांगितलं जात आहे. लाँचिंगपूर्वीच कंपनीने iQOO Neo 10 सिरीजचे डिझाईन शेअर केले आहे. फोनला अतिशय क्लासी लूक देण्यात आला आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
iQOO Neo 10 सिरीज बुकींगसाठी उपलब्ध झाली आहे. कंपनीने फोनबाबत अपडेट शेअर करत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये फोन केशरी आणि राखाडी रंगात दिसत आहे, मोठ्या कॅमेरा डेकोच्या आत ड्युअल रियर कॅमेरा, OIS सपोर्ट, प्लास्टिक फ्रेम आणि ‘NEO TIME TO PLAY’ ब्रँडिंग दिसत आहे. फोनचं डिझाईन अतिशय प्रमियम आहे. (फोटो सौजन्य – X)
अलीकडेच iQOO 13 स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. iQOO 13 मध्ये शक्तिशाली प्रोसेसर Snapdragon 8 Elite देण्यात आला आहे. iQOO 13 स्मार्टफोनमध्ये 6.82-इंचाचा 2K BOE Q10 FHD+ 8T LTPO 2.0 OLED Q10 डिस्प्ले देण्यात आला आहे. iQOO 13 स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX921 प्रायमरी कॅमेरा आहे, जो OIS सपोर्टसह येतो. यासोबतच, फोनमध्ये 50MP Samsung S5KJN1 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP Sony IMX816 टेलिफोटो लेन्स देखील आहे. iQOO च्या या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. iQOO 13 स्मार्टफोनच्या यशानंतर आता लवकरच कंपनीची नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच केली जाणार आहे.
iQoo ने कन्फर्म केलं आहे की फोनमध्ये कंपनीने बनवलेली गेमिंग चिप वापरली जाणार आहे, जी सुपर-रिझोल्यूशन आणि सुपर-फ्रेम अनुभव देईल. iQOO Neo 10 सिरीजमधील दोन्ही फोन 8T LTPO फ्लॅट स्क्रीनसह एंट्री करणार आहेत. फोन अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतील आणि iQOO Neo 10 सिरीजमधील सर्व स्मार्टफोनमध्ये 120W फ्लॅश चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली मोठी बॅटरी असेल. iQOO Neo 10 सिरीजमध्ये iQOO Neo 10 आणि iQOO Neo 10 Pro या स्मार्टफोन्सचा समावेश असणार आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
रिपोर्ट्सनुसार, iQOO Neo10 ला Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर मिळू शकतो, तर Neo10 Pro मधील परफॉर्मंससाठी, कंपनी MediaTek Dimensity 9400 प्रोसेसर वापरू शकते. चिपसेटबद्दलचे डिटेल्स अद्याप कन्फर्म झाले नाही.
डिस्प्ले- iQOO Neo 10 आणि iQOO Neo 10 Pro फोनमध्ये 6.78 इंचाचा फ्लॅट डिस्प्ले असू शकतो, जो 1.5K रिझोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेटसह काम करेल.
प्रोसेसर- मीडियाटेक चिपसेट प्रो मॉडेलमध्ये दिला जाऊ शकतो आणि क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 बेस मॉडेलमध्ये दिला जाऊ शकतो.
कॅमेरा- सीरिजचे दोन्ही फोन 16 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरासह एंट्री करतील. 50MP प्रायमरी सेन्सर आणि 50MP सेकंडरी सेन्सर मागील पॅनलवर उपलब्ध असेल.
बॅटरी आणि चार्जिंग – iQoo Neo 10 सिरीजमधील स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते जी 120W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करेल.
स्टोरेज आणि रॅम- यात 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज असल्याचे सांगितले जाते.
इतर वैशिष्ट्ये- सुरक्षेसाठी या मालिकेत अल्ट्रासोनिक इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध असेल. प्लॅस्टिक फ्रेमपासून डिझाईन तयार केले जाईल. त्यांना पाणी आणि धुळीपासून सुरक्षिततेसाठी आयपी रेटिंग मिळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.