10 हजारांहून कमी किंंमतीत लाँच झाला iQOO चा हा नवा स्मार्टफोन, तगडी बॅटरी आणि पावरफुल कॅमेऱ्याने सुसज्ज
टेक कंपनी iQOO चा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. iQOO चा हा नवीन स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 चिपसेटने सुसज्ज आहे. हा फोन दोन रंगात लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये एआई पावर्ड कॅमेरा आणि इमेज एडिटिंग फीचर्स देखील देण्यात आले आहेत. वीवोच्या सब ब्रँड iQOO च्या लेटेस्ट बजेट स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंंमत जाणून घेऊया.
या दमदार प्रोसेसरसह लाँच होणार Nothing Phone 3 स्मार्टफोन, इतर स्पेसिफिकेशन्सही आले समोर
iQOO Z10 Lite 5G स्मार्टफोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 8GB + 128GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. iQOO Z10 Lite 5G स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये आहे. iQOO Z10 Lite 5G स्मार्टफोन सायबर ग्रीन आणि टाइटेनिमय ब्लू कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनची विक्री अॅमेझॉन इंडियावरून 25 जूनपासून सुरु होणार आहे. 500 रुपयांच्या डिस्काऊंटसह हा फोन 9499 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – X)
The game is about to change. 🗓️⚡
Launched at ₹9,499*, the all-new #iQOOZ10Lite brings you the Segment’s Biggest Battery 5G Smartphone** and the Segment’s Brightest 5G Smartphone*** — all packed in one powerhouse.
🛒 Sale goes live 25th June, 12PM. Only on @amazonIN &… pic.twitter.com/Kpe8J7Ws1Y
— iQOO India (@IqooInd) June 18, 2025
डिस्प्ले : iQOO Z10 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 6.74-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. या फोनच्या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1000 निट्स आहे.
प्रोसेसर आणि मेमरी : iQOO च्या या बजेट स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन फोन 4GB, 6GB आणि 8GB रॅम ऑप्शनसह 256GB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो.
सॉफ्टवेयर : iQOO Z10 Lite 5G स्मार्टफोन अँड्रॉयड 15 वर आधारित Funtouch OS 15 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हा फोन दोन अँड्रॉइड अपडेट्स आणि तीन वर्षांचे सुरक्षा पॅच अपडेट्स देईल.
कॅमेरा : iQOO Z10 Lite 5G स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. हा Sony चा AI कॅमेरा सेंसर आहे. यासोबतच 2 मेगापिक्सेलचा बुके शूटर देखील देण्यात आला आहे. सेल्फीबद्दल बोलायचं झालं तर या फोनमध्ये 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये AI Erase, AI Photo Enhance, आणि AI Document मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
काय सांगता! आता चार लोकं एकत्र करू शकतात डेट, Tinder ने लाँच केलेल Double Date फीचर आहे तरी काय?
कनेक्टिविटी आणि अन्य फीचर्स : IQOO चा हा बजेट फोन ड्युअल सिम सपोर्टसह येतो. यात 5G, ब्लूटूथ आणि USB टाइप-सी पोर्ट आहे. यासोबतच, हा फोन IP64-रेटिंग आणि SGS 5 स्टार अँटी-फॉल सर्टिफिकेशनसह येतो. टिकाऊपणाबद्दल बोलायचे झाले तर, हा MIL-STD-810H-सर्टिफाइड आहे.
बॅटरी आणि चार्जिंग : iQOO Z10 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे.