PHONE(फोटो सौजन्य- PINTEREST)
iQOO ने आज चिनी बाजारात iQOO Z10 Turbo आणि Z10 Turbo Pro स्मार्टफोन लाँच केले आहे. या दोन्ही फोन मध्ये 6.78 इंचाची 1.5K 144FPS AMOLED डिस्प्ले देण्यात आलं आहे. iQOO Z10 Turbo Pro मध्ये Snapdragon 8s Gen4 प्रोसेसर आणि Z10 TURBO मध्ये MediaTek Dimensity 8400 चिपसेट आहे. iQOO Z10 Turbo और Z10 Turbo Pro चे फीचर्स, स्पेसिफिकेशंस आणि किंमत काय आहे? जाणून घेऊयात….
Google चा लेटेस्ट Pixel 9 स्मार्टफोन 15,000 रुपयांना स्वस्त, काय आहे ऑफर?
iQOO Z10 Turbo, Z10 Turbo Pro ची किंमत
iQOO Z10 Turbo 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत 1799 युआन (अंदाजे रुपये 21,025),
iQOO Z10 Turbo 16GB+256GB व्हेरिएंटची किंमत 1999 युआन (अंदाजे रुपये 23,365),
iQOO Z10 Turbo 12GB+512GB व्हेरिएंटची किंमत 2199 युआन (अंदाजे रुपये 25,700)
iQOO Z10 Turbo16GB+512GB व्हेरिएंटची किंमत 2399 युआन (अंदाजे रुपये 28,035) आहे.
iQOO Z10 Turbo Pro 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 1999 युआन (अंदाजे 23,365 रुपये),
iQOO Z10 Turbo Pro 16GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 2199 युआन (अंदाजे २५,७०० रुपये),
iQOO Z10 Turbo Pro 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 2399 युआन (अंदाजे 28,035 रुपये),
iQOO Z10 Turbo Pro 16GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 2599 युआन (अंदाजे 30,370 रुपये) आहे.
हे दोन्ही स्मार्ट फोन ऑरेंज, डेजर्ट ग्रे, व्हाइट और ब्लैक कलर मध्ये उपलब्ध आहे. हे दोन्ही फोन विक्रीसाठी चीन मध्ये उपलब्ध आहे.
iQOO Z10 Turbo आणि iQOO Z10 Turbo Pro ची स्पेसिफिकेशन
iQOO Z10 Turbo आणि Z10 Turbo Pro मध्ये 6.78-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2800×1260 पिक्सेल, 20:9 आस्पेक्ट रेशो, 144Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सॅम्पलिंग रेट, 5500 nits पीक ब्राइटनेस, HDR10+ आणि 4320Hz PWM डिमिंग आहे. Z10 Turboमध्ये Mali-G720 GPU सह 3.25GHz ऑक्टा कोर डायमेन्सिटी 8400 4nm चिपसेट आहे. Z10 Turbo Pro मध्ये ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 8s Gen 44nm प्रोसेसर आणि Adreno 825 GPU आहे. दोन्ही फोनमध्ये 256GB / 512GB UFS 4.1 इनबिल्ट स्टोरेज आणि 12GB / 16GB LPDDR5x रैमसह आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड 15 वर आधारित बेस्ड Origin OS 15 वर काम करतात. या दोन्ही फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि इन्फ्रारेड सेन्सरचा समावेश आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G SA/NSA, Dual 4G VoLTE, (Turbo) Wi-Fi 6, (Turbo Pro) Wi-Fi 7, Bluetooth 6.0, GPS, USB Type C पोर्ट 2.0 आणि NFC यांचा समावेश आहे.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, Z10 Turbo, Z10 Turbo Pro मध्ये f/1.79 अपर्चर आणि मागील बाजूस OIS सपोर्ट असलेला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. टर्बोमध्ये f/2.4 अपर्चर असलेला २-मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आहे, तर टर्बो प्रोमध्ये f/2.4 अपर्चर असलेला ८-मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. दोन्ही फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी f/2.45 अपर्चरसह 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
डाइमेंशनच्या बाबतीत बोलायचे झाले तर, या दोन्ही फोनची लांबी 163.72 मिमी, रुंदी 75.88 मिमी, जाडी 8.09 मिमी आहे आणि Turbo चे वजन 212 ग्रॅम आणिTurbo Pro वजन 206 ग्रॅम आहे. या दोन्ही फोनना धूळ आणि शिंपडेपासून संरक्षणासाठी IP65 रेटिंग देण्यात आले आहे. बॅटरी बॅकअपसाठी, टर्बोमध्ये 7620mAh बॅटरी आहे जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, तर Turbo Pro ध्ये 7000mAh ची बॅटरी आहे जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
boat Chrome Horizon स्मार्टवॉच लाँच, व्हिडिओ वॉच फेसला करते सपोर्ट; लेदर व्हेरिएंटची किंमत काय आहे.