iQOO Z11 ची भारतीय बाजारात एंट्री! डिझाईन अन् फीचर्सने जिंकलं यूजर्सचं मन, जाणून घ्या किंमत
iQOO Z11 स्मार्टफोन 6GB + 128GB, 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या व्हेरिअंट्समध्ये लाँच केला आहे. 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये, 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 44,999 रुपये आणि टॉप-एंड 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य: X)
कंपनी फोनवर खास लाँच ऑफर देखील देत आहे. निवडक बँक कार्डवर 3000 रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काऊंट मिळणार आहे. यासोबतच, फोनवर 1 हजार रुपयांपर्यंत कूपन देखील मिळणार आहे. ज्यांना स्मार्टफोनची पूर्ण किंमत आगाऊ भरायची नाही, ते सहा महिन्यांच्या ‘नो-कॉस्ट ईएमआय’ पर्यायाद्वारेही तो खरेदी करू शकतात. ग्राहक हा स्मार्टफोन ॲमेझॉन, iQOO इंडिया वेबसाइट, रिलायन्स डिजिटल आणि iQOO आणि Vivo रिटेल स्टोअरद्वारे खरेदी केला जाऊ शकतो. स्मार्टफोनची पहिली विक्री 25 ऑगस्टपासून दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे.
Drops, bumps, or a rough day in your bag, the #iQOOZ11 is built to take it and keep going. Military-Grade Durability tested for the real world. Tough on the outside. Reliable on the inside. 🛡️#iQOO #iQOOZ11 #ZSeries pic.twitter.com/AMOQwqNBhm — iQOO India (@IqooInd) August 20, 2026
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या हँडसेटमध्ये 6.83-इंच 1.5K 3D कर्व्ड अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये 2,000 निट्सपर्यंत हाय ब्राइटनेस मोड ब्राइटनेस देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये SGS लो ब्लू लाइट, लो फ्लिकर आणि फाइव-स्टार सनलाइट डिस्प्ले सर्टिफिकेशन्स देखील मिळणार आहे.
डिव्हाईस अँड्रॉईड 16-बेस्ड ओरिजिनओएस 6 वर चालतो. फोनला तीन वर्षांचे ओएस अपग्रेड आणि 5 वर्षांचे सुरक्षा अपडेट मिळणार आहे. फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 7500 टर्बो चिपसेट मिळणार आहे, ज्यासोबत 12GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेज मिळणार आहे. या डिव्हाइसमध्ये 3,800 चौरस मिमीची व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टीम देखील आहे.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ओआयएस आणि f/1.79 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा सोनी आयएमएक्स 882 प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. यासोबतच या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 115-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाला 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. फ्रंट आणि रिअर दोन्ही कॅमेऱ्यांद्वारे तुम्ही 30fps वर 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकता.
आर्क्टिकमध्ये मोठा वैज्ञानिक शोध! समुद्री बर्फाजवळ ढगनिर्मिती करणारे कण अचानक 50 पट वाढले
कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G एलटीई, वायफाय 6, ब्लूटूथ 5.4, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे ऑप्शन्स देखील मिळणार आहेत. विशेष म्हणजेच या नवीन स्मार्टफोनमध्ये 44W फ्लॅशचार्ज सपोर्टसह 7,050mAh बॅटरी दिली आहे.






