Huawei चा नवा मास्टरस्ट्रोक! जगातील पहिला नॉन-फोल्डेबल वाईड स्क्रीन फोन लाँच... प्रतिस्पर्ध्यांची वाढली चिंता
कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 12GB+256GB, 12GB+512GB, 16GB+512GB आणि 16GB+1TB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 5,499 युआन म्हणजेच सुमारे 76,500 रुपये, 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 6,499 युआन म्हणजेच सुमारे 90,330 रुपये, 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत 7,299 युआन म्हणजेच सुमारे 1,01,458 रुपये आणि टॉप 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत 8,799 युआन म्हणजेच सुमारे 1,22,309 रुपये ठेवण्यात आली आहे. सध्या कंपनी या स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंट्सवर 200 युआन म्हणजेच सुमारे 2780 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहे. (फोटो सौजन्य: X)
कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.39-इंच 1.5K LTPS फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या स्क्रीनचा आस्पेक्ट रेशिओ 16:9.5 आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन स्टारी ब्लॅक, नेब्युला व्हाइट आणि स्टारबर्स्ट पर्पल रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये हॉरिजन्टल डुअल कॅमेरा मॉड्यूल आणि मागील बाजूला OSTA चा लोगो देण्यात आला आहे.
हुवावे ओएसटीए ओ1 प्रो स्मार्टफोन Kirin 9030S चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 12GB+256GB, 12GB+512GB, 16GB+512GB, आणि 16GB+1TB हे व्हेरिअंट्स उपलब्ध आहेत. हुवावे स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 200-मेगापिक्सेल 1/1.28-इंच RYYB प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यासोबत साथ 50-मेगापिक्सेल 3.7x RYYB पेरिस्कोप टेलीफोटो आणि Red Maple लेंस देण्यात आले आहे. या फोनमध्ये 66W वायर्ड चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.
काय सांगता!!! Instagram स्टोरी अपलोड केल्यानंतरही मिळणार एडीट पर्याय… यूजर्ससाठी नवं फीचर रोलआऊट
हुवावे स्मार्टफोन HarmonyOS 7 AI Pioneer Edition वर आधारित आहे. हुवावे या फोनला “HarmonyOS AI फोन” असे संबोधते, ज्यामध्ये सिस्टिम स्तरावर AI वैशिष्ट्ये समाविष्ट केलेली आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ‘Kirin 9030S’ प्रोसेसर असलेला हा स्मार्टफोन अशा प्रकारे डिझाईन केला गेला आहे की, त्याचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, चिप आणि क्लाउड घटक यांच्यात उत्तम समन्वय साधला जाईल.
Ans: Huawei ने OSTA O1 Pro हा नवीन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला असून, त्याची प्री-ऑर्डर सुरू झाली आहे.
Ans: या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 5,499 युआन म्हणजेच अंदाजे 76,500 रुपये आहे. टॉप व्हेरिअंटची किंमत 8,799 युआन म्हणजेच सुमारे 1,22,309 रुपये आहे.
Ans: या स्मार्टफोनमध्ये 6.39 इंचांचा 1.5K LTPS फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा आस्पेक्ट रेशिओ 16:9.5 आहे.






