Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IRCTC down: दिवाळीपूर्वीच डाऊन झाले IRCTC अ‍ॅप आणि वेबसाईट, ऑनलाइन तिकीट बुक करण्यात येतेय अडचण

IRCTC वेबसाईट पुन्हा एकदा डाऊन झाली आहे. त्यामुळे जे प्रवासी सध्या गावी जाण्यासाठी तिकीट बुक करत आहेत, त्यांच्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. वेबसाईट डाऊन झाल्याने युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 17, 2025 | 01:38 PM
IRCTC down: दिवाळीपूर्वीच डाऊन झाले IRCTC अ‍ॅप आणि वेबसाईट, ऑनलाइन तिकीट बुक करण्यात येतेय अडचण

IRCTC down: दिवाळीपूर्वीच डाऊन झाले IRCTC अ‍ॅप आणि वेबसाईट, ऑनलाइन तिकीट बुक करण्यात येतेय अडचण

Follow Us
Close
Follow Us:
  • तिकिट बुकिंगला ब्रेक! दिवाळीपूर्वीच क्रॅश झाले IRCTC अ‍ॅप आणि वेबसाईट
  • रेल्वे प्रवाशांना मोठा झटका
  • प्रवाशांना ऑनलाइन बुकिंगचं टेन्शन

दिवाळीपूर्वीच इंडियन रेल्वेचे तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म IRCTC चे अ‍ॅप आणि वेबसाईट डाऊन झाली आहे. त्यामुळे युजर्सना ऑनलाईन तिकीट बुक करण्यात अडचण येत आहे. आज दुपारच्या सुमारास IRCTC चे अ‍ॅप आणि वेबसाईट अचानक डाऊन झाली. त्यामुळे तिकीट बुक केल्या जात नव्हत्या. याबाबत अनेक युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्क्रिनशॉट शेअर करत पोस्ट केली आहे. याशिवाय अनेक युजर्सनी या प्लॅटफॉर्मचे आउटेज रिपोर्ट देखील केले. युजर्सचं असं म्हणणं होतं की, ते IRCTC च्या अ‍ॅप आणि वेबसाईटवरून तात्काळ तिकीट बुक करू शकत नाही.

Diwali 2025: महागडा कॅमेरा विसरा! या दिवाळीत iPhone नेच करा प्रो लेव्हल फोटोग्राफी, या टिप्स ठरतील फायदेशीर

IRCTC च्या वेबसाइट आणि अ‍ॅपमधील हे आऊटेज तात्कळ बुकींगच्या वेळी सुरु झाले. यावेळी अनेक युजर्स तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र यावेळी वेबसाईट अचानक डाऊन झाली आणि युजर्सना तिकीट बुक करण्यात अडचण निर्माण झाली. युजर्सचं म्हणणं होतं की, आयआरसीटीसी वेबसाइट आणि अ‍ॅपमधील बिघाडामुळे युजर्स तिकिटे बुक करू शकणार नाहीत. अहवालानुसार वेबसाइट आणि अ‍ॅपवरील प्रचंड ट्रॅफिकमुळे ही समस्या उद्भवली आहे, ज्यामुळे युजर्स तिकिटे बुक करू शकले नाहीत.

Dear @IRCTCofficial,
During Tatkal ticket booking hours, your website displayed a “Downtime” message, making it impossible to proceed. Kindly look into this issue and ensure smoother service during peak booking times.
Thank you. pic.twitter.com/ZwfXKExi7D
— Nawab Alam 𝕏 (@iamNawabAlam) October 17, 2025

का डाऊन झाली IRCTC चे वेबसाइट आणि अ‍ॅप?

मिळालेल्या माहितीनुसार, IRCTC च्या अधिकाऱ्यांनी देखील मान्य केलं की, तांत्रिक अडचणींमुळे काही काळ लोकांना तिकिटे बुक करण्यात अडचणी आल्या. याशिवाय त्यांनी असं देखील सांगितलं आहे की, त्यांची टीम ही समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. लवकरच, युजर्स आयआरसीटीसी अ‍ॅप किंवा वेबसाइटद्वारे तिकिटे बुक करू शकतील.

डाउनडिटेक्टरवर देखील युजर्सनी केले रिपोर्ट

युजर्स सोशल मीडियावर सतत स्क्रिन शॉट शेअर करत आहे. ज्यामध्ये साइट डाउन आणि एररचे मेसेज देखील दिसत आहेत. ऑनलाइन सर्विस आउटेज होण्याचा मागोवा घेणारी वेबसाइट डाउनडिटेक्टरच्या मते, 49% युजर्सनी आयआरसीटीसी वेबसाइटवर आणि 37% युजर्सनी त्यांच्या अ‍ॅपवर खंडित झाल्याची तक्रार केली. याव्यतिरिक्त, रेल्वे स्थानकांवरून तिकिटे खरेदी करणाऱ्या लोकांनाही ही समस्या येत आहे.

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! गेममध्ये सुरु झाला Dhamaka Sale, प्लेअर्सना मिळणार फ्री रिवॉर्ड्स आणि जबरदस्त जिंकण्याची संधी

लवकरच जारी केला जाणार नवीन नियम

भारतीय रेलवे तिकीट बुकिंगबाबत लवकरच एक नवीन नियम जारी करण्याचा विचार केला जात आहे. हा नवीन नियम रेल्वे प्रवाशांची सुविधा वाढवण्यासाठी तयार केला जाणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, भारतीय रेल्वेचे प्रवासी लवकरच कोणतेही रिशेड्यूल शुल्क न भरता त्यांच्या तिकिटांचे वेळापत्रक नंतरच्या तारखेसाठी पुन्हा तयार करू शकतील. म्हणजेच जर तुम्ही 10 जानेवारीसाठी तिकीट बुकींग केली असेल तर तुम्ही हे तिकीट कॅन्सल केल्याशिवाय तुम्ही पुढील तारीखसाठी तिकीट बुक करू शकणार आहात. सध्या, प्रवाशांना त्यांचे तिकिटे पुन्हा रिशेड्यूल करण्याचा पर्याय नाही. त्यांना त्यांचे तिकिटे रद्द करण्याऐवजी पुन्हा बुक करावी लागतील. टिकट कँसिलेशनचे चार्ज देखील द्यावे लागत आहे.

Web Title: Irctc website app go down before diwali passengers unable to book tickets online tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 01:38 PM

Topics:  

  • IRCTC
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! गेममध्ये सुरु झाला Dhamaka Sale, प्लेअर्सना मिळणार फ्री रिवॉर्ड्स आणि जबरदस्त जिंकण्याची संधी
1

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! गेममध्ये सुरु झाला Dhamaka Sale, प्लेअर्सना मिळणार फ्री रिवॉर्ड्स आणि जबरदस्त जिंकण्याची संधी

iPhone वापरकर्त्यांनो इकडे लक्ष द्या! Perplexity CEO ने दिला महत्वाचा इशारा, चुकूनही करू नका ‘हे’ काम
2

iPhone वापरकर्त्यांनो इकडे लक्ष द्या! Perplexity CEO ने दिला महत्वाचा इशारा, चुकूनही करू नका ‘हे’ काम

सारखा रिचार्ज करून कंटाळलाय? एकदाच करून टाका Jio अन् Airtel चे वार्षिक प्लॅन्स; मिळतील ‘हे’ फायदे
3

सारखा रिचार्ज करून कंटाळलाय? एकदाच करून टाका Jio अन् Airtel चे वार्षिक प्लॅन्स; मिळतील ‘हे’ फायदे

Flipkart Big Bang Diwali Sale: Realme P4 Pro 5G वर जबरदस्त सवलत! लॉन्चपेक्षा 4 हजारांनी स्वस्त
4

Flipkart Big Bang Diwali Sale: Realme P4 Pro 5G वर जबरदस्त सवलत! लॉन्चपेक्षा 4 हजारांनी स्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.