Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! गेममध्ये सुरु झाला Dhamaka Sale, प्लेअर्सना मिळणार फ्री रिवॉर्ड्स आणि जबरदस्त जिंकण्याची संधी
फ्री फायर मॅक्समध्ये धमाका सेल लाईव्ह झाला आहे. या सलदरम्यान फ्री फायर मॅक्स प्लेअर्सना प्रिन्सेस डार्कहार्ट बंडल आणि प्रिन्स डार्कहार्ट बॅकपॅक सारखे गेमिंग आयटम्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. फ्री फायर मॅक्स हा भारतातील पॉपुलर बॅटल रॉयल गेम आहे. या पॉपुलर बॅटल रॉयल गेममध्ये प्लेअर्सना वेगवेगळे इन-गेम आइटम्स मिळवण्याची संधी असते. हे गेमिंग आयटम्स मिळवण्यासाठी प्लेअर्सना इन-गेम करेंसी Diamonds खर्च करावे लागतात. हे डायमंड मिळवण्यासाठी प्लेअर्सना पैसे खर्च करावे लागतात. जर तुम्हाला गेममध्ये वस्तू खरेदी करताना Diamonds वाचवायचे असतील, तर गेममधील नवीनतम ईव्हेंट तुमच्यासाठी लाईव्ह आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्स आकर्षक गेमिंग आयटम्स जिंकू शकतात.
फ्री फायर मॅक्समध्ये धमाका सेल ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना एक्सक्लूसिव इन-गेम आइटम्स तगड्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे नवीन गेमिंग आयटम्स देखील मिळतील आणि प्लेअर्सचा गेम देखील सुधारणार आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. ज्यामध्ये युजर्सना सर्वात आधी एक व्हिल थांबवावे लागणार आहे. या व्हिलला थांबवण्यासाठी तुमच्यासमोर एक नबंर येईल. या ईव्हेंटमध्ये मिळणाऱ्या बक्षिसांवर तुम्हाला त्या नंबर एवढीच सूट मिळेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही व्हिल थांबवल्यानंतर तुम्हाला 62 नंबर दिसला, तर तुम्हाला ईव्हेंटमधील सर्व वस्तूंवर 62 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. या ईव्हेंटमध्ये कोणकोणते रिवॉर्ड्स उपलब्ध आहेत, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Free Fire)
धमाका सेलमध्ये एक्सेस करण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या फोनवर फ्री फायर मॅक्स गेम ओपन करावा लागेल. नंतर, स्टोअर विभागात जावे लागेल. येथे, तुम्हाला धमाका सेल्स बॅनर दिसेल. या बॅनरवर क्लिक केल्याने सर्व रिवॉर्ड्स अनलॉक होतील.
Moto G100: बजेट किंमतीत मोटोरोलाने लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका